Headlines

भारतासाठी पहिला Oscar जिंकणाऱ्या मराठमोठ्या महिलेचे कोल्हापुरशी खान कनेक्शन!

[ad_1]

Oscar 2023 : ऑस्कर हा पुरुस्कार चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. Oscar हा जगातील सगळ्याच कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वर्षी या पुरुस्कार सोहळ्याची जगातील सगळे कलाकार आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. फक्त अभिनेता, दिग्दर्शक नाही तर संगीत दिग्दर्शकापासून कॉस्च्युम डिझायनरपर्यंत सगळेच याची आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा तर सगळ्या भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे. आता कोणत्या कलाकाराला कोणता पुरस्कार मिळणार? हे जाणून घेण्यासाठी सगळे आतुर आहेत. या सगळ्यात आज आपण अशा एका व्यक्ती विषयी जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीनं भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला. 

1982 साली प्रदर्शित झालेल्या गांधी’ या चित्रपटासाठी भानू अथैय्या (Bhanu Athaiya) यांना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनरचा (costume design) पुरस्कार मिळाला होता. गांधी या चित्रपटाचे दिग्दर्शन रिचर्ड अँटेनबरो यांनी केले होते. या चित्रपटातून भानू यांनी भारताला त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. त्यांनी हा पुरस्तार ब्रिटिश डिझायनर John Mollo यांच्यासोबत शेअर केला होता. भानू अथैया या मराठी असून त्यांचे खरे नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये (Bhanumati Annasaheb Rajopadhye) असे होते. त्यांचा जन्म 28 एप्रिल 1929 साली महाराष्ट्रातील कोल्हापुर येथे झाला होता. 

हेही वाचाOscar 2023 : नॉमिनेशन मिळालेले हे चित्रपट आजच पाहा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर

भानू या सगळ्यात आधी मॅगझिन्समध्ये फॅशन इलस्ट्रेटर म्हणून काम करत होत्या. एका मॅगझिन एडिटरनं त्यांना कॉस्च्यूम डिझायनर होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भानू यांनी कॉस्च्यूम डिझायनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांना 1952 साली प्रदर्शित झालेल्या देवानंद यांच्या ‘सीआयडी’ या चित्रपटातून कॉस्च्युम डिझायनर म्हणून संधी मिळाली. 

हेही वाचा : Oscars Award 2023: ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर नाही तर ‘ही’ अभिनेत्री करणार डान्स

भानु अथैय्या यांनी चित्रपटसृष्टीत सहा दशक काम केलं. या काळात त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले होते. त्या चित्रपटांच्या यादीत ‘प्‍यासा’, ‘गाइड’, ‘सत्‍यम शिवम सुंदरम’, ‘चांदनी’, ‘लगान’, ‘स्‍वदेस’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिरो हिरालाल’, ‘अग्निपथ’ सारखे अनेक चित्रपट आहेत. दरम्यान, 15 ऑक्टोबर 2020 रोजी भानू यांचे मुंबईतील कुलाबा येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यावेळी भानू यांचे वय 91 वर्षे होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *