Headlines

कोल्हापूर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेत आमदारांना निवृत्त शिक्षक ठरला वरचढ; विरोधकांवर सत्ताधाऱ्यांची मात | retire teacher won election defeated mla in kolhapur

[ad_1]

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शिक्षक कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत काँग्रेसचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा धुव्वा उडवत स्वाभिमानी सहकारी आघाडीचे नेते, निवृत्त मुख्याध्यापक दादा लाड यांनी संस्थेवरील वर्चस्व कायम ठेवले. रविवारी लाड यांच्या आघाडीने सर्व २१ जागा जिंकून चौथ्यांदा संस्थेवरील नेतृत्व सिद्ध केले.

कोजिमाशि संस्थेवर वर्चस्व ठेवण्यासाठी जोरदार संघर्ष झाला होता. ९५.५० टक्के मतदान झाल्याने चुरस दिसून आली होती. मतमोजणीत लाड गटाने पहिल्या फेरीपासून आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. निकालानंतर शिक्षकांनी गुलालाची उधळण करीत भर पावसात लाड यांना उचलून धरत आनंद व्यक्त केला.

हेही वाचा >>> ओबीसी आरक्षणाखेरीज निवडणुका झाल्यास उद्रेक; काँग्रेस ओबीसी शाखेच्या प्रदेशाध्यक्षांचा इशारा

विजयी उमेदवार याप्रमाणे

प्रकाश कोकाटे, मनोहर पाटील , अविनाश चौगुले, श्रीकांत कदम, सुभाष खामकर, दत्तात्रय घोगरे, मदन निकम, शरद तावदारे, लक्ष्मण बेळेकर, उत्तम पाटील, श्रीकांत पाटील, राजेंद्र रानमाळे, राजेंद्र पाटील, सचिन शिंदे, अनिल चव्हाण, पांडुरंग हळदकर, राजाराम शिंदे, जितेंद्र म्हैशाळे, ऋतुजा पाटील, शितल हिरेमठ.

हेही वाचा >>> औरंगाबादच्या नामांतरावर राष्ट्रवादी नाराज? शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “याची यत्किंचितही…”

आमदारकीचे राजकारण आडवे

या निवडणुकीमध्ये शिक्षक आमदार निवडीचे राजकारण चर्चेत आले होते. शिक्षक आमदार आसगावकर यांनी निवडणूक काळात दादा लाड यांनी विरोध केला होता असा मुद्दा प्रचारात मांडत लाड यांना सत्तेतून हटवण्याचा त्यांनी निर्धार केला होता. तर लाड यांनी पतसंस्थेवरील आपली पकड कायम असल्याचे दाखवून देत आमदारांना शह दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *