Headlines

कोकणासह राज्यात अतिमुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा

[ad_1]

मुंबई : कोकणासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आता ओडिशाच्या बाजूने, बंगाल उपसागरात कमी दाबाची क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावर द्रोणीय क्षेत्र असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, राज्यासह मध्य भारतात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अतिवृष्टीचा, तर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, १२ जुलै रोजी पूर्व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे

पावसाची तीव्रता वाढणार

मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) मुंबईत मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर दुपारी १२ ते १ दरम्यान कायम राहणार आहे. पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे.

घाट भागात जोर वाढणार

भागात सोमवारीपासून मुसळधारपासून पडत आहे. सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला असून मंगळवारी पहाटेही पावसाचा जोर कायम होता. संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *