Headlines

Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की…

[ad_1]

Ajay Devgan On Kajol : दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण (Koffee With Karan) शो आजकाल खूप चर्चेत आहे. या शोच्या एपिसोडमध्ये आतापर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले. यंदाच्या सीझनमध्ये (KWK 8 Promo) अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती. बॉलिवूडमधील गॉसिपचा तडाका हा शोमध्ये पहायला मिळतोय. अशातच आता या शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण आणि रोहित शेट्टीची जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.

सोमवारी रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनी करण जोहरच्या मंचावर हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची पोलखोल केली आहे. या एपिसोडमध्ये करणने विचारलेल्या प्रश्नावर अजय देवगणने अशी काही उत्तरं दिलीयेत की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. त्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये करण जोहरने अजयवर प्रश्नांचा भडिमार केला. त्या प्रत्येक प्रश्नाला अजयने मोकळेपणाने उत्तरं दिली. तू पार्टीला का जात नाहीस?, असा प्रश्न करण विचारतो. त्यावर मला कोणी फोन करुन बोलवत नाही, असं सरळ उत्तर अजय देतो. तुझे फोटो एअरपोर्टवर का क्लिक होत नाही? असा प्रश्न करणने विचारल्यावर मी त्यांना फोन करून बोलवत नाही, असंही अजयने सांगितलं. पुढच्या प्रश्नावर करणने गुगली टाकली.

काजोल तुझ्याशी बोलत नसेल तर त्याचं कारण काय असतं? असा प्रश्न करणने विचारला. त्यावर, मी त्याच दिवसाची वाट पाहत आहे, जेव्हा ती माझ्याशी बोलणार नाही, असं म्हणत करणच्या गुगलीवर अजयने सिक्स मारला. तर इंडस्ट्रीत तुझा दुश्मन कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर करण जोहर हँग झाला.

एकेकाळी करण तूच माझा दुश्मन होतास, असं सरळ उत्तर अजयने दिलं. अजयच्या या उत्तराने करण निशब्द झाला. रोहित शेट्टी याने या भागात अनेक किस्से सांगितले आहेत. चित्रपट हिट असो वा फ्लॉप, अजय आणि सलमान खान हे त्यांच्या व्हॅनमध्ये चील करत असतात, असं रोहित शेट्टी म्हणतो.

पाहा Video

दरम्यान, कॉफी विथ करणच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *