Headlines

कॉ. वृंदाताई करात यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ जाहीर | Kranti Singh Nana Patil Social Award announced to Vrinda Tai Karat amy 95

[ad_1]

सांगली : क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार ” चालुवर्षी कॉ. वृंदाताई करात यांना देण्यात येणार आहे.

कॉ.करात या पश्चिम बंगाल मधील असून विद्यार्थी दशेपासून एस.एफ.आय. या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नावर संघर्ष करत आल्या आहेत. दिल्लीमधील कापड गिरणी मजुरांच्या हक्कासाठी कामगार संघटनेच्या माध्यमातून काम केले .२००५ मधे पश्चिम बंगालमधुन त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

एक अत्यंत जागरुक आणि लढाऊ खासदार म्हणून त्यानी प्रभावी काम केले आहे . त्याचवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलीट ब्युरोवर त्यांची निवड झाली. दिल्लीमध्ये सामान्य लोकांच्या राहत्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात येत असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन सामान्य माणसांना दिलासा मिळवून दिला.

सामान्य माणसाप्रती असलेली त्यांची बांधीलकी आणि योगदान लक्षात घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाने त्याना आपला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे . दि. ६ ऑगष्ट रोजी विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते हा पुरस्कार कॉम्रेड वृंदाताई करात याना प्रदान करणेत येणार आहे. मानपत्र , सन्मानचिन्ह , शाल , श्रीफल आणि २१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठचे संघटक ॲड . सुभाष पाटील संघटक , अध्यक्ष भाई सुभाष पवार आणि सचिव ॲड . नानासाहेब पाटील यांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *