Headlines

”कितीही संकट आली तरी…”, आईला कॅन्सर असल्याचं कळताच Kartik Aryan च्या कुटुंबावर संकटांचा डोंगर

[ad_1]

Kartik Aryan Post on Mother: अभिनेता कार्तिक आर्यन हा आजचा एक आघाडीचा (Kartik Aryan Instagram) अभिनेता आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भुलभुलैया 2’ या चित्रपटानं कार्तिक आर्यनला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर कार्तिक आर्यन हा सुपरस्टार्सच्या यादीत पोहचला आहे. बॉलिवूडविश्वाची काहीही माहिती नसताना हा मुलगा बॉलिवूडमध्ये आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आला आणि त्यानं आपली वेगळी अशी ओळख या हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. कार्तिक आर्यननंही अनेकदा बॉलिवूड सिनेसृष्टीतल्या घराणेशाहीवर भाष्य केले आहे परंतु या सगळ्याला टक्कर देत त्यानं आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. कार्तिकनं इन्टाग्रामवरून एक इमोशनल पोस्ट (Kartik Aryan Emotional) शेअर केली आहे. 

कार्तिक आर्यन याची आई गेल्या दोन-तीन वर्षांपासून कर्करोगानं ग्रस्त होत्या. आता त्या या आजारातून बऱ्या झाल्या असून ही खुशखबर आपल्या चाहत्यांना देत कार्तिक आर्यन प्रचंड भावुक झाला आहे. त्यानं काल रात्री आपला आणि आपल्या आईचा एक हसरा फोटो शेअर करत भावुक नोट इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्याच्या लाखो चाहत्यांनी या पोस्टखाली शुभेच्छा देत आपल्या सद्भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय चेहऱ्यांनीही यावेळी त्याच्या पोस्ट खाली कमेंट केली आहे. (kartik aryan shares an inspiring post on instagram after his mother winning battle with cancer)

हेही वाचा – The Kerala Story ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रूपये

काय लिहिलं कार्तिक या पोस्टमध्ये? 

”काही दिवसांपुर्वी मोठा C म्हणजे Cancer हा आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यात तग धरून होता. यामुळे आम्ही सर्वच खचून गेलो होतो आणि काय करावं हे आम्हालाही कळतं नव्हतं. पण माझ्या आईला याचे श्रेय आहे. तिच्या एवढी ताकदवान, कणखर आणि मजबूत मनाची सेनानी दूसरी कोणीच नाही. त्यामुळे C म्हणजे तिच्या Courage नं आपल्या आयुष्यातील सर्व मळभ दूर केला आणि या सगळ्यावर मात केली. या सगळ्यातूनच आम्ही खूप शिकलो. या जगात आपल्या आईवडिलांच्या पांठिब्यापेक्षा आणि प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही.” 

बॉलिवूडचं प्रेम 

त्याच्या या पोस्टखाली सानिया मिर्झा, अनुपम खेर, आयुष्यमान खुराना, सोनाली बेंद्रे, एकता कपूर, नुपूर सनन, सान्या मल्होत्रा, कपिल शर्मा, विकी कौशल, रॉनित रॉय, अंगत बेदी, मनिष मल्होत्रा, संयामी खेर अशा बॉलिवूडच्या दिग्गजांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. आत्तापर्यंत या पोस्टला 7 लाख लाईक्स आले आहेत. सध्या कार्तिकची ही (Bollywood News) पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कार्तिक आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *