Headlines

kishori pednekar replied to kiran pawaskar on uddhav thackeray statement spb 94

[ad_1]

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप, टीका टीप्पणी करण्यात येत आहेत. दरम्यान, काल शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी उद्धव ठाकरेंबाबत आपत्तीजनक वक्तव्य केले होते. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पावस्करांना इशारा दिला आहे.

हेही वाचा – “जी. एन.साईबाबासारख्या व्यक्तीला निर्दोष सोडणे हा…”; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडवीसांची प्रतिक्रिया

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

“काल किरण पावस्करांनी जे वक्तव्य केलं आहे. त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, जेव्हा हरीष वरळीकर या आमच्या शिवसैनिकाने किरण पावस्करांच्या थोडाबीत मारली होती. ती योग्यच होती. या पावस्करांचा इतिहास बघितला तर हे गाजर मिळताच हे राष्ट्रवादीत गेले. तिथे सहा वर्ष राहिले आहे. मध्ये अडीच वर्ष गायब होते. मात्र, जसा शिंदे गट निर्माण झाला. तसेच हे परत उगवले. मुळात कोण सर्वात मोठा गद्दार कोण? आणि कोण जास्त वाचाळविरासारखं बोलतो? अशी शिंदे गटात स्पर्धा लागली आहे. काल पावस्करही वाचाळविरासारखं बोलले. पावस्कर यांनी लक्षात ठेवावे, एकदा थोबाडीत बसली आहे, त्यामुळे त्यांनी तोंडसूख घेण्याचा प्रयत्न करू नये”, अशा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे साहनुभूतीचे राजकारण करतात, या आरोपांवरही किशोरी पडणेकरांनी प्रतिक्रिया दिली. “हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे. जर कोणत्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्या परिवारातील सदस्यांना तिकीट देऊन ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच येते. आम्हीही तोच प्रयत्न केला. मात्र, आताच्या भाजपा-शिंदे गटाच्या सरकारने ते औदार्य दाखवले नाही. याउलट त्यांना कशी अडचण होईल, याचाच प्रयत्न त्यांनी केला. आता केवळ दीड दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे, असे असताना दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नीला अशा पद्धतीने वागणूक देणं हे किती योग्य आहे, याचा विचार जनतेने करावा.”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – Andheri East Bypoll Election Updates : अंधेरी पूर्वसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार का? ऋतुजा लटकेंसमोर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…, वाचा लाईव्ह अपडेट्स…

काय म्हणाले होते किरण पावस्कर?

काल किरण पावस्करांनी उद्धव ठाकरेंबाबात एक विधान केलं होतं. “एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत असेल तर तिला आपल्या बाजूने बोलावण्याइतकं घाणेरडं राजकारण एकनाथ शिंदे कधीच करणार नाहीत. एकनाथ शिंदे मर्द आहेत. ४० लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले. एखाद्या महिलेला बोलावून असले धंदे ते करणार नाहीत. उद्धव ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात”, असे ते म्हणाले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *