Headlines

kishori pednekar reaction on cm ekanath shinde devendra fadnavis maharashtra visit spb 94

[ad_1]

राज्याचे मुख्ममंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ते नंदूरबार येथून आपल्या दौऱ्याची सुरूवात करतील. तसेच उद्धव ठाकरेदेखील लवकरच राज्याचा दौरा करणार असून त्यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे, दरम्यान, यावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यातील आगामी निवडणुकांना होणाऱ्या विलंबावरूनही त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – “ते उत्तर देण्यालायक…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात प्रत्युत्तर!

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

”आम्ही मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे या दृष्टीने बघत नाही. आज ते सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी दौरे करायलाच पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना परिस्थिती होती. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र सांभाळला. त्यामुळे आज आपण दणक्यात सण साजरे करत आहोत, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा – परभणीत लोकसभेला भाजप-शिवसेना ‘सामना’?; मेघना बोर्डीकर यांचे दौरे सुरू

दरम्यान, राज्यातील आगामी निवडणुकांना होणाऱ्या विलंबावरूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ”कोणी विचारलं की मनपा निवडणुका कधी होणार? तर एक म्हणतात देवाला आणि कोर्टालाच माहिती, दुसरे म्हणतात जानेवारीत होतील. म्हणजे सत्तेत बसलेले दोन देव राज्यात निवडणुका कधी होणार हे ठरवतील. अर्थात निवडणुका कधीही लावा लोकशाही बळकट आहे, हे तुम्हाला लवकरच दिसून येईल”, अशी टीकाही त्यांनी केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *