Headlines

भारतीय चलनी नोटेवर गणपती-लक्ष्मीचा फोटो लावल्यास फायदा! काय सांगतं ज्योतिषशास्त्र? वाचा

[ad_1]

Lakshmi Ganesh Photo On Indian Currency: भारतीय चलनाचा मोठा इतिहास आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यात काळानुरूप बदल होत गेले. भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. फक्त एक रुपयांची नोट केंद्र सरकारकडून छापण्यात येते. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईवर दिलेल्या माहितीनुसार 1949 साली भारत सरकारनं पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेची प्रतिकृती तयार केली. चलनी नोटेवर ब्रिटनच्या राजाच्या जागी अशोक स्तंभ असावा यावर एकमत झालं. अशोक स्तंभासह 1950 साली 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जारी केल्या. त्यानंतर महात्मा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त 1969 साली पहिल्यांदा चलनी नोटेवर गांधींजींचा फोटो छापण्यात आला. मात्र चलनी नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा अशी मागणी होत आहे. 

भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गांधीजींच्या फोटोऐवजी लक्ष्मीचा फोटो छापावा अशी मागणी केली होती. आता तीच रि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ओढली आहे. पण गांधींजींचा फोटो तसाच ठेवून गणपती आणि लक्ष्मीचा फोटो टाकावा अशी त्यांची मागणी आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असताना ज्योतिषशास्त्रानुसार गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो छापल्याने खरंच फायदा होईल का? जाणून घ्या

गणपती
हिंदू धर्मात श्री गणपती प्रथम पूजनीय दैवत आहेत. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूज केली जाते. गणपती बाप्पा सुख, समृद्धी, सौभाग्य, शिक्षण, कला, विज्ञान आणि धनाचे दैवत आहेत. कोणतीही पूजा करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. इंडोनेशियामध्ये रुपया हे चलन आहे. इंडोनेशियातील 20 हजारांच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे.

Shani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय 

लक्ष्मी
हिंदू धर्मात देवी लक्ष्मी ही ऐश्वर्य, समृद्धी, संपत्ती यांची देवता आहे. समुद्रमंथनावेळी देवी लक्ष्मी सागरातून उत्पन्न झाली. लक्ष्मीच्या आठ आवतारांना ‘श्री अष्टलक्ष्मी’ असं म्हंटलं जातं. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी असा नावाने आठ रुपं प्रसिद्ध आहेत. घरात ऐश्वर्य आणि समृद्धी यावी यासाठी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीत कार्तिक आमावास्येला पूजेत चलनी नोटा ठेवून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

नोटांबाबत काय सांगतं वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार नोटा मोजताना कधीही थुंकी लावू नये. यामुळे देवी लक्ष्मीची अवकृपा होते. त्याचबरोबर फाटक्या, मळक्या नोटा पर्समध्ये ठेवू नये. तसेच नोटा चुरगळू किंवा फोल्ड करू नयेत. त्यावर लिहून नोटा खराब करू नयेत. यामुळे नोटा खराब होतात. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं होतं. 

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *