Headlines

Kieron Pollard Road : मुंबई महापालिकेकडून रस्त्याला किरॉन पोलार्डचं नाव?

[ad_1]

Viral Photo : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तोडफोड बॅट्समन किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी (IPL 2023) निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर पोलार्डची मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग कोचपदी (Mumbai Indians Batting Coach) नियुक्ती करण्यात आली. पोलार्डने क्रिकेट चाहत्यांना आयपीएलमध्ये 13 वर्ष जोरदार गेम दाखवला. पोलार्डने मुंबईला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले. अनेकदा पराभव दिसत असताना पोलार्डने मुंबईला सनसनाटी विजय मिळवून दिलाय. तसेच फिल्डिंग करताना पोलार्डने कायम टीमसाठी धावा वाचावल्या आहेत. बाऊंड्री लाईनवर घेतलेल्या कॅच सर्वांच्याच लक्षात आहेत. दरम्यान यानंतर पोलार्ड पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरलाय. (fact check ipl 2023 mumbai indians kieron pollard road board photo viral on social media)

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत मुंबई महापालिकेकडून एका रस्त्याला किरोन पोलार्डचं (Kieron Pollard Road) नाव दिलंय, असा हा बोर्ड व्हायरल होतोय. मात्र हा फोटो एडिटेड आहे. मुंबईत अशाप्रकारे कोणत्याच रस्त्याला पोलार्डचं नाव देण्यात आलेलं नाही. पोलार्डचं आयपीएलनिमित्ताने मुंबई टीमसोबत पर्यायाने मुंबई शहराशी खेळाडू म्हणून 13 वर्ष नातं होतं. त्यामुळे पोलार्डप्रती असेलल्या प्रेमाखातर कुणीतरी सोशल मीडियावर हा फोटो एडिट करुन व्हायरल केलाय.

दरम्यान मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. यामध्ये मुंबईने 13 खेळाडूंना करारमुक्त केलंय.  तर 16 खेळाडूंना संघात कायम राखलंय.

मुंबईने कायम राखलेले खेळाडू 

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, हृतिक शोकीन, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय सिंग, मोहम्मद अर्शद खान, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स आणि आकाश मधवाल.  

मुंबईने करारमुक्त केलले खेळाडू 

किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंह, आर्यन जुयाल, बासिल थंपी, डॉनियल सॅम्स, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मयंक मर्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, राइल मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *