Headlines

किडनी विकणार या भीतीनं ‘झुंड’मधील ‘या’ अभिनेत्याचा थरथराट

[ad_1]

मुंबई : बहुविध मुद्द्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आजवर सातत्यानं साकारले. समाजातील काही दुर्लक्षित घटकांना त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी प्रकाशझोतात आणलं आणि एका रात्रीत काही चेहऱ्यांना अपेक्षाही नसेल इतली लोकप्रियता मिळवून दिली. (Jhund Movie)

काहींनी तर मंजुळे म्हणजे एक परिस आहे, असंही म्हटलं. काहीदिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटातील बाबू. 

‘क्या फूर फूर कर रहा है… इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या…’, हा डायलॉग आठवतोय का? चित्रपट पाहिला असेल तर लगेचच तुम्ही होकारार्थी उत्तर द्याल आणि नसेल तर या डायलॉगच्या निमित्तानं तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहाल. 

(Babu) ‘बाबू’ हे पात्र साकारत प्रियांशू ठाकूर यानं घेतलेला हा डायलॉग अनेक शिट्ट्या, टाळ्या आणि प्रेक्षकांची उत्सफूर्त दाद मिळवून गेला आहे. आपण आज जे काही आहोत ते सर्व काही नाजराज मंजुळे यांच्यामुळेच आहोत अशीच कृतज्ञतेची भावना हा ‘बाबू’ व्यक्त करतो. 

चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासून आपण इतको लोकप्रिय झाल्याचं पाहून खुद्द प्रियांशूसुद्धा थक्क आहे. आपल्याला मिळणारं हे प्रेम पाहता आता खरं आयुष्य जगतोय अशी भावना त्यानं व्यक्त केली. 

कशी झाली चित्रपटासाठीची निवड? 
आम्ही रेल्वे ट्रॅकपाशी बसलेलो असताना तिथं भूषण दादा आला, कॅमेरा वगेरै त्याच्या हातात होता. तेव्हा सुरुवातीला आम्ही घाबरलो. त्यानंतर गोष्टी सुरु धाल्या. मी सैराट पाहिलेला, त्यातला हिरो मला ठाऊक होता. पण दिग्दर्शकाबाबत फार माहिती नव्हती, असं प्रियांशू म्हणाला. 

तिथं झाली नागराज मंजुळे यांची एंट्री. नागराज मंजुळे यांनी आपली चित्रपटासाठी निवड केल्याचं ऐकून तो धावत घराकडे गेला आणि तिथं आईला याची कल्पना दिली. 

पण, तुझ्यात असं काय पाहिलं की त्यांनी चित्रपटासाठी निवडलं ? असाच उलट प्रश्न त्याच्या आईनं त्याला विचारला. तू तर काही हिरोसारखा वगैरे दिसत नाहीस, तिथे नेतील मुंबईला आणि किडनी वगैरे विकतील तुझी असं आई म्हणाली आणि मी काय चाललंय काय याच विचाराने घाबरलो, असं तो म्हणाला. 

यानंतर नागपूरच्या आमदार निवास येथे त्याला नेण्यात आलं. पुढे पुण्याला चित्रीकरणासाठी नेण्याचं त्याला सांगितलं. पण, किडनी विकण्याची भीती त्याच्या मनातून उतरली नव्हती. त्यामुळं त्यानं आपल्या तीन-चार मित्रांनाही सोबत न्यावं यासाठी त्यांची नावं पुढे केली. 

बस्स… त्या क्षणापासून प्रियांशूचा ‘बाबू’ झाला आणि त्याच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *