Headlines

विकेट गेल्यावर रोहितवर संतापला Shubman Gill; पव्हेलियनमध्ये परतत असताना केली शिवीगाळ? VIDEO व्हायरल

[ad_1]

IND vs SL : भारत विरूद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील वनडे सामन्यांच्या सिरीजला सुरुवात झाली आहे. आजच्या या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांनी उत्तम खेळ करत श्रीलंकेला 374 रन्सचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाची ओपनिंग जोडी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मैदानात या दोघांमध्ये वाद झाल्याचंही दिसून आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पहिल्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने हाफ सेंच्युरी करत चांगली सुरुवात केली. मात्र शतकाकडे वाटचाल करताना त्याची विकेट गेली आणि रोहितसोबत त्याचा वाद झाल्याची घटना घडली. यावेळी पव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने अपशब्द वापरल्याचंही कॅमेरात कैद झालं आहे.

कर्णधार रोहित शर्मावर वैतागला Shubman Gill 

प्रथम फलंदाजी करण्यासाठी शुभमन गिल आणि रोहित शर्मा उतरले. या दोघांनीही शतकी पार्टनरशिप केली. दोन्ही खेळाडू सेट झाले असताना शुभमन गिल आऊट झाला. यावेळी पव्हेलियनमध्ये परतत असतात तो रोहित शर्मावर नाराज असल्याचं दिसून आलं. 

टीम इंडियाच्या 20 व्या ओवहरसाठी दसुन शनाका गोलंदाजी करत होता. या ओव्हरचा चौथा बॉल दसुनन शुभमनला टाकला. यावेळी गिलने तो फ्लिक केला आणि एलबीडब्ल्यू आऊट झाला. अशा परिस्थितीत DRS साठी फार आशेने रोहित शर्माकडे पाहत होता. मात्र यावेळी रोहितने DRS न घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे 23 वर्षीय गिल निराश झाल्याचं पहायला मिळालं. पव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने अपशब्द वापरल्याचं कॅमेरातमध्ये दिसलंय.

रोहित शर्माची कॅप्टन इनिंग

कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. रोहितने पहिल्या वनडे सामन्यात तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. आजच्या या सामन्यात रोहितने 83 रन्सची खेळी केली. ज्यामध्ये रोहितने 6 फोर आणि 2 सिक्स मारले. वनडे करियरमधील रोहितचं हे 47 वं अर्धशतक होतं. 

टीम इंडियाकडून विराट कोहलीचं तुफान शतक

पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने वादळी खेळी करत शतक (Virat Kohli Century) झळकावलं. कोहलीने 80 बॉल्समध्ये 100 रन्स केले. मात्र 113 रन्सवर त्याला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं. कोहलीने 73 वं शतक पूर्ण (Virat Kohli 73th Century) केलं आहे. तर विराट कोहलीने आज वनडेमधील 45 वं शतक ठोकलंय. त्यामुळे त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या महान रेकॉर्डची बरोबरी केलीये.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *