Headlines

kedar dighe replied to shital mhatre on rashmi thackeray statement spb 94

[ad_1]

नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याने शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. अशातच या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने शिंदे गटाकडून टीका होते आहे. दरम्यान, याबाबत आता दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी शितल म्हात्रेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – “सुप्रियाताईंनी लोकांना सांगावं की गेली ४०-५० वर्षं..”, गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया; ‘त्या’ विधानावरून टोला!

काय म्हणाले केदार दिघे?

“दिवंगत आनंत दिघे यांनी कधीही अध्यात्मिक क्षेत्राला राजकीय आखाडा बनवला नाही. आज अनेक जणं देवीच्या दर्शनाला येतात. त्यामुळे इथे कोणी आमने-सामने येण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक जण इथे देवीचरणी असणारी श्रद्धेसाठी येत असतो. त्याच हेतूने रश्मी ठाकरेही येथे येत आहेत.”, अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली आहे.

हेही वाचा – चंद्रकांत खैरे म्हणाले एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, आता शिंदे गटाचे स्पष्टीकरण; अर्जुन खोतकर म्हणाले, “हा तर…”

शितल म्हात्रेंच्या टीकेला दिले उत्तर

दरम्यान, काल शिंदे गटातील शितल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावरून टीका केली होती. ठाण्यातल्या देवीच्या दर्शनाला मुंबईतून महिला आणाव्या लागतात, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यालाही केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. रश्मी ठाकरेंचा दौरा पूर्वनियोजित होता. सामनातून सांगितल्या प्रमाणे रश्मी ठाकरे जर देवीच्या दर्शनाला येत असतील तर शिवसेनेच्या महिला आघाडींनी त्यांच्या हातून आरती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यात चूकीचं काहीही नाही”, असे ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *