Headlines

KBC च्या मंचावर अचानक रडू लागली स्पर्धक, Amitabh Bachchan बसल्या बसल्या घाबरले, पाहा व्हिडीओ

[ad_1]

Kaun Banega Crorepati 14:  गेल्या अनेक वर्षापासून कौन बनेगा करोडपती या शोने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं आहे. गेल्या 13 सिझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अशातच आता 14 व्या सिझनला देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. केबीसीच्या (KBC) हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकासोबत अनेकदा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गप्पा मारताना दिसतात. अशातच केबीसीच्या मंचावर धक्कादायक घटना घडली.

KBC मध्ये नेमकं काय घडलं?

केबीसीमध्ये  (KBC) हॉट सीटसाठी सिलेक्शन होत असतं. नेहमीप्रमाणे सिलेक्शन होत असताना अमिताभ बच्चन यांनी एका महिलेचं नाव पुकारलं. पिंकी जावरानी (Pinky Jawarani)  या महिलेचं सिलेक्शन करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांनी नाव पुकारल्यावर पिंकी जावरानी यांना अश्रू अनावर झाले. पिंकी यांना खूप आनंद झाला. त्यांचे आनंद अश्रू थांबता थांबत नव्हते.

पिंकी जावरानी यांना रडता पाहून अमिताभ बच्चन देखील घाबरले (Amitabh bachchan kbc). पिंकीला रडताना पाहून अमिताभ बच्चन तिचे अश्रू पुसण्यासाठी तिला टिश्यू देतात. मला टिश्यू देण्याची नोकरी लागली, असं म्हणत अमिताभ बच्चन रडणाऱ्या पिंकीला हसवण्याचा प्रयत्न करतात. त्यावर महिलेने देखील मनातील गोष्ट सांगितली.

मी टिव्हीवर बसत होती आणि विचार करत होते की, सर कधी मला स्वत:हून टिश्यू देतात, असं पिंकी म्हणाली (Pinky Jawarani full episode). त्यावर अमिताभ यांनी देखील महिलेची मस्करी केली. आता संधी मिळाली ना, आता डोळे पुसून घ्या, असं अमिताभ हसता हसता म्हणाले. त्यावेळी महिलेने टिश्यू परत देण्यास नकार दिला.

Amitabh Bachchan कोणाला देतात देवाचा दर्जा? नाव ऐकताच स्पर्धक ढसाढसा रडली, पाहा Video

दरम्यान, टिश्यू परत करण्यास नकार दिल्यावर अमिताभ बच्चन यांनी, मला टिश्यू परत द्या नाहीतर माझी नोकरी जाईल, असं अमिताभ बच्चन म्हणाले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी (Kaun Banega Crorepati 14) प्रश्न उत्तराचा खेळ सुरू ठेवला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *