Headlines

काश्मीर स्फोटात अभिनेत्याचं घर उध्वस्त; तरीही कसा राहतो इतका आनंदी?

[ad_1]

मुंबई : हिंदी कलाजगतामध्ये प्रचंड लोकप्रिय अशा कुटुंबाशी नातं जोडलं गेलं आणि आधीपासूनच प्रसिद्ध असणाऱ्या एका अभिनेच्याच्या नशिबी आणखी लोकप्रियता आली. बी टाऊनच्या शाही कुटुंबाशी नातं जोडलं जाणारा हा अभिनेता आहे, कुणाल खेमू. (Kunal Khemu Bollywood Actor kashmir home destroyed in blast )

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी, सोहा अली खान हिच्याशी कुणालनं लग्न केलं. संसारात रमलेला कुणाल त्याच्या कारकिर्दीलाही तितकंच प्राधान्य देताना दिसला. अशा या अभिनेत्याबद्दलची फार क्वचितच वेळा समोर आलेली ही माहिती आपल्याला स्तब्ध करत आहे. 

कुणाल एक काश्मिरी पंडित आहे, 1989 च्या आधी त्याचंही घर काश्मिरमध्येच होतं. एका मुलाखतीदरम्यान खुलासा करताना कुणालनं सांगितलं होतं, की काश्मिरच्या खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण सुरु असतानाच एका स्फोटात त्याचं घर उध्वस्त झालं होतं. 

स्फोट इतका मोठा होता की, त्यानं कुणालही हादरला होता. तेव्हा त्याचं वयही फार कमी होतं. परिणामी नेमकं काय सुरुये हेच त्याला कळेना. 

हा तोच दिवस होता जेव्हा त्याचं संपूर्ण घर देशभरात टीव्हीवर दाखवलं जात होतं. वय लहान असल्यामुळं आपलं घर टीव्हीवर दाखवतात याचं त्याला फारच कौतुक वाटत होतं. आपण प्रसिद्ध होत असल्याचंच त्याला वाटत होतं. पण, परिस्थितीची दाहकता त्याला फार नंतर लक्षात आली. 

काश्मीरच्या खोऱ्यातील या वातावरणामुळं त्याच्या कुटुंबाला नाईलाजानं तिथून काढता पाय घ्यावा लागला. मुलाखतीत सांगताना मायभूमीपासून दुरावलं जाण्याचा सर्वात मोठा धक्का कुणालच्या आई- आजोबांना बसला होता. वातावरण निवळल्यानंतर त्याचं कुटुंब श्रीनगरला गेलं, पण केव्हाच तो काश्मीरला जाऊ शकला नाही. 

पुढे ‘कलंक’ या चित्रपटाच्या निमित्तानं कुणालला काश्मीरला जाण्याचा योग आला. तेव्हा त्याला प्रचंड आनंद झाला होता. कारणही तसंच होतं, जन्मभूमीमध्ये जाऊन तो तिथल्या लोकांशी तिथल्याच भाषेत संवाद साधत होता. 

Kunal Kemmu opens up on parenting challenges during COVID-19 lockdown, says  Soha Ali Khan handled 'major chunk of it'

कुणालवर बालपणीच इतका मोठा आघात झाला, इतकी वर्षे त्यानं हे दु:ख पचवलं, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर कधीच याची एक छटाही पाहायला मिळालेली नाही. 

एखाद्या जागेशी आपली नाळ जोडली गेली, की ते नातं इतक्या सहजासहजी तुटत नाही , असं म्हणतात. कुणालसाठी काश्मीरमधील त्याचं हे घर म्हणजे याच नात्याची प्रतिची देणारं होतं असं म्हणायला हरकत नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *