Headlines

Karpoori Thakur Formula : जेव्हा मुख्यमंत्र्यांनी रागात 400 बंदुका खरेदी केल्या, ‘भारतरत्न’ कर्पूरी ठाकुर यांच्या संघर्षाची कहाणी!

[ad_1]

Karpoori Thakur to be awarded Bharat Ratna : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर (Karpoori Thakur) यांना देशातील सर्वाच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर करत याची माहिती दिली. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. 24 जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांची 100 वी जयंती साजरी केली जाणार आहे. अशातच आता केंद्र सरकारने सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. कर्पूरी ठाकूर यांनी मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी बहूमुल्य योगदान दिलं. त्यांचा ‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’ काय होता? (Former Bihar chief minister Karpoori Thakur to be awarded Bharat Ratna posthumously)

कर्पुरी ठाकूर यांनी आरक्षणासाठी ‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’ सादर केला होता. याचा उद्देश सरकारी सेवांमध्ये मागासवर्गीयांना समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करणं हा होता. नोव्हेंबर 1978 मध्ये त्यांनी बिहारमध्ये मागासवर्गीयांसाठी 26 टक्के आरक्षण लागू केलं. यानंतर 1990 च्या दशकात मंडल आयोगाच्या शिफारशींचा टप्पा निश्चित केला गेला. मात्र, कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला सादर करण्याआधी कर्पुरी ठाकूर यांचं सरकार अडचणीत आलं होतं. नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊया…

बिहार सरकारचे दोन वेळा मुख्यमंत्री आणि अनेक दशके आमदार आणि विरोधी पक्षाचे नेते राहिलेले कर्पूरी ठाकूर यांनी आपल्या राजवटीत अनेक कठोर निर्णय घेतले. आणीबाणी संपल्यानंतर कर्पूरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्याचवेळी बिहारमध्ये तणावाची परिस्थिती होती. बिहारमधील कथित दलितांच्या हत्याकांडामुळे कर्पूरी ठाकूर खूप नाराज झाले. दुर्गम भागात झालेल्या हत्याकांडानंतर पोलीस येण्यास आणि इतर संरक्षणात्मक उपायांना उशीर झाल्यामुळे ते नाराज होते, असं गौतम सागर राणा सांगतात. कर्पूरी ठाकूर यांची कल्पना दलितांना प्रशिक्षित करून त्यांना सरकारकडून स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देण्याची होती. जेणेकरून दलित स्वतःचे संरक्षण करू शकतील, असा त्याचा उद्देश होता. मात्र, यावरून मोठा गोंधळ झाला.

कर्पूरी ठाकूर यांनी दलितांच्या संरक्षणासाठी घेतलेला कोणालाही न पटणारा होता. विरोधकांनी त्यावेळी चांगलाच गोंधळ घातला. त्यांनी अकाली सरकार उलथवून टाकण्याची धमकी दिली. मात्र, विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्याने सरकारला ही योजना गुंडाळावी लागली. ही योजना लागू केल्यास नक्षलवादी हिंसाचार आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा प्रसार मोठ्या प्रमाणात थांबू शकला असता, असे गौतम सागर राणा सांगतात.

सामाजिक कार्य

24 जानेवारी 1924 रोजी समस्तीपूरच्या पितोझिया (आताचे कर्पुरीग्राम) येथे जन्मलेले कर्पूरी ठाकूर हे बिहारचे एकदा उपमुख्यमंत्री, दोनदा मुख्यमंत्री आणि अनेक दशके आमदार आणि विरोधी पक्षाचे नेते होते. 1952 मध्ये पहिल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर ते बिहार विधानसभा निवडणुकीत कधीही पराभूत झाले नाहीत. 1967 मध्ये ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी इंग्रजीची अट रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. एवढंच नाही तर आर्थिकदृष्ट्या गरीब मुलांच्या शाळेची फी माफ करण्याचे कामही त्यांनी केलंय. 1971 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत ना-नफा जमिनीवरील महसूल कर बंद केला.

धडाडीची कार्यपद्धती

1977 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंगेरीलाल आयोगाची अंमलबजावणी आणि राज्यात नोकरीत आरक्षण लागू केल्यामुळे अनेकजण नाराज झाले होते. राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना समान वेतन आयोग लागू पहिला निर्णय कर्पूरी ठाकूर यांनी घेतला होता. शिबिराचे आयोजन करून त्यांनी एकाच वेळी 9000 हून अधिक अभियंते आणि डॉक्टरांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची ख्याती संपूर्ण देशात पोहोचली होती.

दरम्यान, कर्पूरी ठाकूर यांनी राजकारणात नेहमी लवचिक दृष्टिकोन स्वीकारला. समाजासाठी काम करणं हाच माझा उद्देश आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. राजकारणातील एवढ्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नावावर घरही नव्हतं. राजकारणात त्यांनी अनेक मित्र जपले ते ही अखेरच्या श्वासापर्यंत… वयाच्या 64 व्या वर्षी 17 फेब्रुवारी 1988 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *