Headlines

दुसऱ्याच्या ताटात नजर जाताच डाएटवर असणारी करीना व्याकुळ होऊन म्हणाली, ‘हा पदार्थ…’

[ad_1]

Kareena Kapoor Khan : सेलिब्रिटी म्हटलं की या मंडळींचीय जीवनशैली त्यांना मिळणारा नफा आणि तत्सम गोष्टींचा सर्वसामान्यांना कमाल हेवा वाटतो. हीच सेलिब्रिटी मंडळी नेमकं काय खातात, कसा व्यायाम करतात असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात. सोशल मीडियामुळं या प्रश्नांचीही उत्तरं मिळत आहेत. कारण, सेलिब्रिटींचे आहारतज्ज्ञ त्यांच्या परिनं या माध्यमाचा वापर करत त्यांचंत्यांचं वर्तुळ तयार करताना दिसत आहेत. अभिनेत्री करीना कपूर खानची आहरजत्ज्ञ आणि या क्षेत्रातील एक मोठं नाव असणारी (Rujuta Divekar) ऋजुता दिवेकरही त्यातलच एक नाव. (bollywood Actress kareena kapoor wants usal and chiwda as dietitian rujuta divekar shares video)

इन्सटाग्रामवर (Instargram) सक्रिय असणारी ऋजुता तिच्या फॉलोअर्ससाठी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतींचा कंटेंट, टीप्स, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीही तिनं मिश्रधान्यांच्या उसळीचा एक व्हिडीओ शेअर केला. जिथं ती एका ताटात उसळ घेऊन त्यावर पोह्यांचा (Chiwda) चिवडा घेताना दिसतेय. खमंग चिवडा, चमचमीत उसळ आणि सोबतीला मसाल्यांचा तिखटपणा नियंत्रणात आणणारं दही असा एक परिपूर्ण आहार ती व्हिडीओमधून दाखवत आहे. 

ऋजुतानं शेअर केलेल्या या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून अनेकांनी तो पाहिला आहे. फॉलोअर्सनी तर आहारात उसळीचाही समावेश करण्याचं ठरवलं आहे. ऋजुताच्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट येत असतानाच एक कमेट अशी आली जिनं तिचंही लक्ष वेधलं. ही कमेंट होती, अभिनेत्री करीना कपूर खानची. 

करीना आणि ऋजुताचं नातं… 

करीनासाठी ऋजुता बऱ्याच वर्षांपासून आहाराची आखणी करून देत आहे. थोडक्यात ऋतुता करीनाची आहारतज्ज्ञ आहे. तिनं जेव्हा उसळीचा व्हिडीओ शेअर केला तेव्हा कोणा दुसऱ्याचं ताट पाहून करीनाही व्याकूळ झाली. ‘हा पदार्थ माझ्या डाएटचा भाग का नाहीये? मला तो चिवडा हवाय, काय सुरेख दिसतोय. मी हवंतर पुढचे काही दिवस दहीभातही खाईन पण, त्यानंर हेच हवंय’, अशी कमेंट करीनानं या व्हिडीओवर केली. 

bollywood Actress kareena kapoor wants usal and chiwda as dietitian rujuta divekar shares video

करीनाची ही व्याकुळ आर्जव ऐकल्यानंतर ऋजुतानंही तिला उसळ डाएटचा भाग करु अशी हमी देत सर्वप्रथम हा चिवडा पाठवतेय असंही म्हटलं. दुसऱ्याच्या ताटात पाहून करीनाच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तिला या साऱ्याचा फायदाही झाला. तुम्ही उसळ खाता का? या उसळीचा कोणता प्रकार तुम्हाला आवडतो?  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *