Headlines

Karan Deol Marriage: लेकाच्या लग्नाच्या कार्यक्रमात सनी देओलचा डान्स; VIDEO तुफान व्हायरल

[ad_1]

Karan Deol Marriage: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) आता विवाहबंधनात अडकणार आहे. देओल कुटुंबाकडून लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, नुकताच करण देओलचा रोका सोहळा पार पडला असून, कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. मुलाचं लग्न असल्याने यावेळी सनी देओलही सर्वसामान्य बापाप्रमाणे आपला आनंद साजरा करताना दिसत होता. इतकंच नाही तर त्याने रोका सोहळ्यात डान्सही केला असून व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

सनी देओल यावेळी 2018 मधील ‘बधाई हो’ चित्रपटातील ‘मोरनी बनके’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सनी देओल आपल्या लाजऱ्या स्वभावासाठी ओळखला जातो. दरम्यान यावेळीही डान्स करताना सनी देओल तशाच प्रकारे करताना दिसत आहे. 

दरम्यान, या कार्यक्रमात सनी देओल, बॉबी देओल आणि अभय देओल फोटोसाठी एकत्र आले होते. 18 जूनला करण देओल आणि त्याची प्रेयसी द्रिशा आचार्य (Drisha Acharya) यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 

करण देओलने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून सहेर बंबानेही बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. सनी देओलनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 2021 मध्ये आलेल्या ‘वेल्ले’ या चित्रपटातही करण देओल दिसला होता. यामध्ये त्याने त्याचा काका अभय देओलसोबत स्क्रीन शेअर केली. दरम्यान ‘अपने 2’ मध्येदेखील तो दिसणार आहे. यामध्ये त्याचे आजोबा धर्मेंद्र, वडील सनी आणि काका बॉबी देओलदेखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा देओल कुटुंब चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 

दरम्यान, धर्मेंद्र करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत दिसणार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि शबाना आझमीदेखील आहेत. दुसरीकडे, गेल्या आठवड्यात सनी देओलचा गदर चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आली आहे. या चित्रपटाचा सिक्वेल आला असून 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ आणि अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ सोबत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहण्यास मिळू शकते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *