Headlines

कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चा टीझर अखेर रिलीज, वाजपेयींच्या भूमिकेत दिसला ‘हा’ मराठी कलाकार!

[ad_1]

मुंबई : नुकताच अयोध्येत भगवान श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा केवळ अयोध्येतच नाही तर संपुर्ण देशासोबत देशाबाहेरही मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. या सोहळ्याला अनेक उद्योजकांनी, राजकीय नेत्यांनी यासोबतच अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री कंगना राणौतदेखील या सोहळ्याला उपस्थित हजर होती. अयोध्यामधील अनेक फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत शेअर करत होती. आता कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेट अनाउन्स केल्यानंतर या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. समोर आलेल्या या टीझरमध्ये कंगना राणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या टीझरमध्ये कंगनासोबत अनुपम खेरदेखील दिसत आहेत. हा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे टीझरमध्ये
या टीझरची सुरुवात अनुपम खेरच्या आवाजाने सुरुवात होते. यावेळी अनुपम खेर म्हणत आहेत की, ‘भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट वेळ आली आहे. हे सरकार राज्य नाही, हे अहंकाराचं राज्य आहे.  हे आमचं नाही या देशाचं मरण आहे.  ही हुकूमशाही थांबली पाहिजे. यानंतर मागून कंगना रणौतचा आवाज येतो- मला या देशाचे रक्षण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही… कारण  इंदिरा इज इंडिया एंड इंडिया इज इंदिरा.’

कंगना राणौतने शेअर केला व्हिडीओ
हा टीझर व्हिडीओ कंगनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझर कंगनाने शेअर करताच काही वेळातच हा टीझर प्रेक्षकांने डोक्यावर घेतला आहे. सध्या हा टीझर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याआधी कंगना राणौतने चित्रपटाचा आणखी एक टीझर रिलीज केला होता ज्यामध्ये तिने तिचा फर्स्ट लुक रिवील केला होता. या सिनेमात त्या वेळची कहाणी आहे जेव्हा 25 जून,1975 ला  इमरजन्सी लागली होती. त्यावेळी काय सिच्यूएशन होती. हेच या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 

१४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार इमरजन्सी
कंगना राणौतने  23 जानेवारीला या सिनमाचा टीझर रिलीज करण्याआधी ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेटची अनाउन्समेट केली होती. हा सिनेमा 14 जून, 2024 ला रिलीज होणार आहे. मुख्य म्हणजे कंगना या सिनेमात मुख्य अभिनेत्री असण्यासोबत तिने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही घेतली आहे. याआधी कंगनाचा तेजस सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जो फ्लॉप ठरला होता.

1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनाभोवती हा चित्रपट फिरतो. यात विरोधी पक्षनेते जेपी नारायणच्या भूमिकेत अनुपम खेर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत मिलिंद सोमण दिसणार आहेत. ‘इमर्जन्सी’मध्ये महिमा चौधरी आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *