Headlines

कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

[ad_1]

Kamal Haasan birthday Special Thug Life Teaser :  दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट मणिरत्नम यांच्यासोबत होणार आहे आणि या चित्रपटाचं नाव ‘ठग लाइफ’ असं आहे. 1987 मध्ये ‘नायकन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या 36 वर्षांनंतर कमल हासन आणि मणिरत्नम एकत्र आले आहेत. याच चित्रपटाची झलक कमल हासन यांनी दाखवली आहे. त्याचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. 

कमल हासन यांचा हा नवा चित्रपट ‘ठग लाईफ’ पोस्टरमध्ये सगळं काही असं ब्लर किंवा अस्पष्ट दिसत आहे. त्यात त्यांनी चेहरा हा एका कपड्यानं झाकला आहे आणि त्यासोबत पाच लोक हे उभे असल्याचे दिसत आहे. या पाच लोकांचे चेहरे देखील दिसत नाही आहेत. मात्र, त्यांच्या हातात शस्त्र असल्याचं पाहायला मिळत आहे. 

चित्रपटाच्या टीझरविषयी बोलायचे झाले तर सुरुवात ही मिणिरत्नम फिल्म्स आणि ए आर रहमान यांच्या बॅनरनं होते. यानंतर एक मैदान दिसत, जिथे कमल हासन एकटे उभे असल्याचं सुरुवातीला दिसतं. अंगावर एक कपडा घेऊन निशस्त्र उभे आहेत. त्यांच्या हातावर पट्ट्या आहेत. लांब केस, डोळ्यात राह आणि अॅक्शन सीन पाहायला मिळत आहे. तर त्यांच्या विरोधात काही लोक असून ते व्हिलनच्या भूमिकेत असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. 2.55 मिनिटाच्या टीझरनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

हेही वाचा : सचिन तेंडुलकरची लेक करते शुभमन गिलला डेट! सारानंच दिली हिंट

‘ठग लाइफ’ विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाची सह-निर्मिती राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि मद्रास टॉकीज द्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटात जयम रवि, तृषा, दुलकर सलमान, अभिरामी आणि नासिर सारखे कलाकार दिसणार आहेत. संगीतकार एआर रहमान यांचं या चित्रपटासाठी खास म्यूजिक आहे. 

‘ठग लाइफ’ शिवाय कमल हासन यांच्याकडे ‘इंडियन 2’ हा चित्रपट देखील आहे. हा चित्रपट 1996 च्या ब्लॉकबस्टर विजिलेंट अॅक्शन चित्रपटाचा पुढचा भाग आहे. हा चित्रपट 12 एप्रिल 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजल अग्रवाल, सिद्धार्थ आणि रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. याशिवाय कमल हासन हे कमल नाग अश्विन यांच्या एपिक सायन्स-फिक्शन चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ मध्ये दिसणार आहेत. त्यांच्या शिवाय या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *