Headlines

कलाजगताला मोठा धक्का ! या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

[ad_1]

Shocking News: कलाजगतातून एक मोठी आणि दुःखद बातमी समोर येतेय , प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं निधन झालं आहे. (sidhhaant suryavanshi passed away due to heart attack)

जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांत अचानक बेशुद्ध पडला.  (heart attack after workout in gym) . त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटं त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र शेवटी त्याला वाचण्याचे सर्व प्रयत्न असफल झाले. त्याने या जगाचा निरोप घेतला. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने काम करून आपला वेगळा ठसा उमटवला होता,

नुकतेच झी टीव्हीवरील ‘ममता’  (Mamata zee tv serial actor passes away) या मालिकेत अक्षयची भूमिका साकारून  सर्वांची वाहवा त्याने मिळवली होती  त्याचसोबत कुसुम या मालिकेतून त्याने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं.

त्यानंतर कृष्णा अर्जुन, कसौटी जिंदगी की, जमीन से आसमां तक, विरुद्ध, भाग्यविधाता, क्या दिल मै है  या अनेक मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली होती. याचसोबत  स्टार प्लस वाहिनीवरील ‘गृहस्ती’ या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. 

जीममध्ये वर्कआउट करताना त्याला हार्ट अटॅक आला असं सांगितलं जात आहे मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकल नाही.  सिद्धार्थ च्या जाण्यानं कालजगताला मोठा धक्का बसला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *