Headlines

बॉलीवूडचा ‘हा’ सुप्रसिद्ध अभिनेता होता काजोलचा पहिला क्रश, एकूण धक्का बसेल

[ad_1]

Bollywood Crush : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकार कोणा न कोणाच्या प्रेमात असण्याचे किस्से आपण ऐकतो. काहीजण ज्याच्यासोबत प्रेम संबंध आहे त्यांच्यासोबत विवाह करतात. पण काही सेलिब्रिटी असे देखील आहेत ज्यांच्या क्रशची बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा आहे. आपण नेहमीच बातम्यांमध्ये वाचत असतो. हा बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्रीचे क्रश. आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत तिच्या क्रशचे नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तिचं नाव आहे काजोल (kajol). काजोल कमी चित्रपटांत काम केले आहे पण तिचे काही चित्रपट (Movies) प्रंचड हिट झालेत. त्यामध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale dulhaniya le jayenge) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलीच कमाई केली होती. आजही त्या चित्रपटातील गाणी (Songs) आणि काही सीन चाहत्यांच्या मनात घर करुन गेले आहेत. 

तुम्हाला माहितच असेल काही कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बिनधास्त भाष्य करतात. आयुष्मान खुरानाने  (Ayushmann Khurrana) प्रीती झिंटा ही त्याचे क्रश आहे हे सांगितले होते तर दिलजीत दोसांझ आणि कार्तिक आर्यनने (Kartik aryan) करीना कपूर खान (Kareena kapoor khan) ही त्यांची क्रश आहे असे सांगितले होते. या यादीत काजोलचे नाव देखील जोडले आहे ज्यावर चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) सगळ्यांसमोर सांगितले आहे. (bollywood famous actress Kajol first crush was akshay kumar not ajay devgan karan johar spoke about this matter nz)

काजोलचे अभिनेता अक्षय कुमारवर क्रश

करण जोहरने अलीकडेच सांगितलं की त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री काजोलचे अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay kumar) क्रश आहे. काजोलचे क्रश तिचा नवरा अजय देवगण नसून अक्षय कुमार हा तिचा क्रश (crush) होता हे जाणून घेणे रोमांचकारी आहे. काजलने तिच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झलक दिखला जा (Zhalak Dikhla ja) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये गेली होती. कलर्स टीव्हीने (Colors T.V) शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, होस्ट मनीष पॉलने काजोल आणि शोचे जज करण जोहर यांच्यासोबत क्विझ गेम खेळला. 

हे ही वाचा – Disha Patani चं आतापर्यंतच सर्वात बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून थक्क व्हाल

करण जोहरने दुजोरा दिला

खेळादरम्यान मनीष करणला विचारतो, “काजोल मॅमचा बॉलीवूडमध्ये अजय देवगण (Ajay Devgn) सोडून कोण क्रश होता?” ज्यावर करणने एका स्लेटवर ‘अक्षय कुमार’ लिहिले. त्याचे उत्तर ऐकून काजोल हसताना दिसली. पुढे, गेममध्ये, काजोलने असेही सांगितले की करण चित्रपट निर्माता नसता तर कोरिओग्राफर झाला असता.

 

 

अक्षय आणि काजोल यांची 90 च्या दशकातील यशस्वी बॉलिवूड स्टार्स

अक्षय आणि काजोल यांची 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी बॉलिवूड स्टार्समध्ये (Bollywood Star’s) गणना केली जात असली तरी, त्यांनी एकाहून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले नाही. 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘ये दिल्लगी’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते.

करणने काजोलसोबतच्या मैत्रीची गोष्ट सांगितली

द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) भागामध्ये, कपील शर्माने विचारले की, करण जोहरने काजोलची पहिली भेट कशी झाली? यावर करण जोहर म्हणाला, ‘हिना चित्रपटाच्या प्रीमियर पार्टीत मी काजोलला भेटलो. काजोलचा अक्षय कुमार हा क्रश होता आणि ती संपूर्ण प्रीमियरमध्ये त्याला शोधत होती आणि तेव्हा मी तिचा आधार होतो. त्यामुळेच आम्ही दोघेही संपूर्ण कार्यक्रमात त्याला शोधत होतो. आम्ही अक्षयला भेटलो नसलो तरी आमच्या मैत्रीची ही सुरुवात ही इथूनच झाली. आम्ही दोघं दक्षिण मुंबईत राहत होतो आणि इथून पुढे आमची मैत्री वाढत गेली.

 

 

हे ही वाचा – Priyanka Chopra ची दिग्गज अभिनेत्यांवर टीका, ‘अभिनेते फुकटच…’

रॉकी आणि राणीच्या  दिग्दर्शनात व्यस्त

करण जोहर त्याचा नवीन चित्रपट रॉकी आणि राणीच्या (Rocky & Rani) प्रेमकथेच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), रणवीर सिंग (Ranveer Singh), धर्मेंद्र (Dharmendra) आणि जया बच्चनसारखे (Jaya Bacchan) स्टार्स दिसणार आहेत. धर्मा प्रॉडक्शन (Dharma Production) निर्मित हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, काजोलचा सलाम वेंकी हा चित्रपट यावर्षी 9 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *