Headlines

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड T20 सिरीजमधील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहाल?

[ad_1]

IND vs NZ 2nd T20I Live Streaming: टीम इंडिया आणि न्युझीलंडमध्ये (India vs New Zealand) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसरा सामना उद्या 20 नोव्हेंबर रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

20 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुईच्या बे ओव्हल स्टेडियमवर भारतीय वेळेप्रमाणे दुपारी 12 वाजता हा सामना सुरू होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर केलं जाणार आहे. त्याचसोबत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग दिसेल.

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 20 टी-20 सामने झालेत. यामध्ये नेहमी तुल्यबळ स्पर्धा निर्माण झाली. टीम इंडियाने यापैकी 9 सामने जिंकलेत तर न्यूझीलंडनेही 9 सामने जिंकले आहेत. यामधील दोन सामने बरोबरीत सुटलेत. अशा परिस्थितीत माउंट मौनगानुईमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यातही रंजक स्पर्धा पाहायला मिळेल.

‘हे’ खेळाडू करणार ओपनिंग

न्यूझीलंड मालिकेतून रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी ईशान किशन आणि शुभमन गिलला सलामीची संधी मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू स्फोटक फलंदाजीसाठी ओळखतात. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशनने याआधीही सलामीची जबाबदारी पार पाडली आहे.

विराटच्या जागी कोणाला खेळवणार?

विराट कोहली टीम इंडियासाठी (Team India) तिसऱ्या क्रमांकावर सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उदयास आला आहे, परंतु तो न्यूझीलंड मालिकेत खेळत नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते. अय्यरमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता आहे.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *