Headlines

“कधी कधी काही गोष्टी..,” एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवारांचा टोला | ajit pawar criticizes eknath shinde on dahi handi players reservation

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दहीहंडी या खेळाला क्रीडा प्रकारात स्थान देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. हाच मुद्दा घेऊन आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. काही गोष्टी उत्साहाच्या भरामध्ये बोलून टाकल्या जातात. मात्र प्रत्यक्षात खोलीमध्ये गेल्यावर समजतं की, त्या गोष्टी कृतीमध्ये आणताना किती अडचणी येतात, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> अंधेरी निवडणुकीसाठी फडणवीसांना पत्र लिहिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी भाजपाच्या…”

आज गुजरात येथे झाले ल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ विजेता चषकाचे अनावरण आणि ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव सभागृहाचे विरोधी नामकरण पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते जुन्या पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते.

हेही वाचा >>> राज ठाकरेंची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांवर आणणार तीन भागांचा चित्रपट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवाला क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय घेतला.आता हे प्रकरण ऑलिम्पिक संघटनेकडे जाणार आहे. त्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “कोणालाही ना उमेद करायला नको त्यामुळे तेव्हा मी काही बोलो नाही. ते इतक साधं सोपं नाही. क्रीडा प्रकारात ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. त्यामध्ये काही गैरप्रकार झाले. वेगळी प्रमाणत्रं, वेगळी संघटना काढल्याचे प्रकार समोर आले, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी ; बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

“मुख्यमंत्र्यांनी नुकतेच मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. मुंबई, ठाणे या भागात मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. कधी कधी काही गोष्टी उत्साहाच्या भरामध्ये बोलून टाकल्या जातात. मात्र प्रत्यक्षात खोलीमध्ये गेल्यावर समजतं की, या घोषणा कृतीमध्ये आणताना अडचणी आहेत,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा >>> तुमचं खरं नाव स्वरराज, मग आता केवळ राज नाव का? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले…

“गुजरात येथे झालेल्या स्पर्धेतील ट्रॉफी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाणार असून राज्यातील खेळाडूचा विचार करता महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन उभारण्याची मागणी करणार आहे. येत्या मंगळवारी किंवा बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री यांची भेट घेणार आहे. विजेत्या खेळाडू आणि संघटनासाठी अधिक रक्कम कशी मिळेल, याबाबत चर्चा करणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *