Headlines

Jyeshtha Pournima 2022: धन प्राप्तिसाठी वटपौर्णिमेला करा हे उपाय, जाणून घ्या

[ad_1]

Astrology: ज्योतिषशास्त्रात सण, अमावास्या, पौर्णिमा, ग्रहांचं गोचर यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्या त्या दिवशी केलेले उपाय सकारात्मक ऊर्जा देतात.  14 जून 2022, मंगळवारी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. याला वट पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. तसेच या दिवशी लक्ष्मीची पूजा करून दान करण्याची परंपरा आहे. याशिवाय या ज्येष्ठ पौर्णिमेला काही विशेष योग असल्याने महत्त्व अधिकच वाढले आहे. 

लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. तसेच या दिवशी केलेले काही विशेष उपाय फार लवकर प्रभावी असतात. 

पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीसमोर लाल कपड्यावर 11 कवड्या ठेवाव्यात, त्यानंतर त्या सर्वांवर हळदीचा टीका लावावा. रात्रभर या कवड्या अशाच ठेवाव्यात. यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीदेवीला नमस्कार करून ही कवड्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावी. असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच उत्पन्नात वाढ होते.

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यानंतर खीरीचा प्रसाद अर्पण करा. तसेच 5 मुलींना भोजन द्या, जर हे शक्य नसेल तर त्यांना खीर खायला द्या. असे केल्याने माता लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील.

कर्जबाजारी झाला असाल तर ऋणातून मुक्त होण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. लक्ष्मीला सुगंधित उदबत्ती, गुलाबाची फुले, खीर अर्पण करावी.

ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे आशीर्वादही मिळतात. शक्य असल्यास संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

भरपूर पैसा मिळवण्यासाठी लक्ष्मी स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 

या दिवशी दूध, साखर, पांढरे वस्त्र यासारख्या पांढर्‍या वस्तूंचे दान करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *