Headlines

Jos Buttler | जॉसचा दिल्ली विरुद्ध ‘हल्ला बोल’, ठोकलं मोसमातील तिसरं शतक

[ad_1]

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरचं  (Jos Buttler)  पुन्हा एकदा राक्षसी स्वरुप पाहायला मिळालं आहे. बटलरने या मोसमात पुन्हा एकदा शानदार शतक ठोकलंय. बटलरने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात वादळी शतक खेळी केलीय. बटलरने अवघ्या 57 चेंडूमध्ये  8 चौकार आणि 8 गगनचुंबी सिक्स मदतीने हे शतक पूर्ण केलं. (dc vs rr ipl 2022 match 34 jos buttler hit 3rd century on 15th season) 

बटलरचं या मोसमातील हे तिसरं तर आयपीएल कारकिर्दीतील एकूण चौथं शतक ठरलं. बटलरने दिल्ली विरुद्ध एकूण 65 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीने 116 धावा केल्या.

बटलरने या आधी या मोसमात मुंबई इंडियन्स आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सेंच्युरी केली होती. जॉसने कोलकाता विरुद्ध 59 बॉलमध्ये 9 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. जॉसने केकेआर विरुद्ध एकूण 103 धावांची खेळी केली होती. 

तर त्याआधी जॉसने मुंबई इंडियन्स विरुद्ध या मोसमातील वैयक्तिक आणि एकूण पहिलंवहिलं शतक ठोकलं होतं. तेव्हा जॉसने एकूण 66 चेंडूत हे शतक पूर्ण केलं.

दिल्लीला 223 धावांचं आव्हान

दरम्यान बटलरच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं. 

राजस्थानकडून बटलर व्यतिरिक्त देवदत्त पडिक्लने नाबाद 54 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन संजू सॅमसन यानेही नाबाद 46 रन्स केल्या. दिल्लीकडून मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), रोवमॅन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान आणि खलील अहमद.

राजस्थान रॉयल्स : जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, करुण नायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मॅककॉय आणि युजवेंद्र चहल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *