Headlines

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार? अनंत करमुसे मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका | anant karmuse beaten case plea filed in supreme court against jitendra awhad demand cbi enquiry

[ad_1]

राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याआधी हीच मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

हेही वाचा >>> न्यायालयाच्या निर्णयानंतर सुनिल राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, “संजय राऊतांनी ठरवलंय की…”

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मारहाणीची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात सव्वा वर्षांनंतर म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२१ रोजी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.

हेही वाचा >>> गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

नेमकं प्रकरण काय?

घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले होते. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती.

याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *