Headlines

जर Rohit Sharma चं ऐकलं असतं तर…; Virat Kohli ला स्वतःचच खरं करणं पडलं महागात

[ad_1]

Virat Kohli: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते बरेच आहेत. कोहली खराब फॉर्ममध्ये जरी असला तरीही त्याच्या चाहत्यांना फरक पडत नाही. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या (IND vs AUS) पहिल्या सामन्यात विराट कोहली चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र त्याला चांगला खेळ करता आला नााही. मुख्य म्हणजे, आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) विराटला सल्ला दिला होता. मात्र रोहितचं विराटने ऐकलं नाही आणि तो विकेट गमावून बसला. दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसतोय.

रोहितचं न ऐकणं विराटला पडलं महागात

विराट कोहली जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा भारताने अश्विन आणि पुजाराची विकेट गमावली होती. सलग 2 विकेट गमावल्याने रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही काही प्रमाणात चिंता होती. यावेळी विराट कोहली फलंदाजीसाठी आणि आणि रोहितने त्याला काही प्रमाणात समजावलं. 

कदाचित रोहित विराटला, क्रीजवर जास्त वेळ टिकून राहण्यासाठी समजावत असल्याचा, अंदाज लावला जातोय. मात्र रोहित शर्माची ही गोष्ट विराटने ऐकली नाही आणि केवळ 26 बॉल्समध्ये 12 रन्स करून तो पव्हेलियनमध्ये परतला. जर कोहलीने रोहितचं ऐकलं असतं, तर विराट मोठी खेळी करू शकला असता, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिलीये.

कांगारूंविरूद्ध एकटा लढला Rohit Sharma

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरच्या टेस्टमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा जुना रोहित शर्मा पहायला मिळाला. 

नागपूरचं पीच असं आहे जिथे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकु

मार यादव सारखे फलंदाज स्वस्ताक माघारी परतले. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकटाच खेळला आणि खणखणीत शतक मारलं. रोहितने त्याच्या खेळीमध्ये आतापर्यंत 14 फोर आणि 2 सिक्स लगावत 105 रन्सची खेळी केली आहे.

 

रोहितचा नवा रेकॉर्ड

कर्णधार रोहित शर्माने शतकासह जबरदस्त कारनामा केला आहे. कॅप्टन म्हणून शतक करण्याऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरं स्थान पटकावलं आहे. तर भारताचा कर्णधार म्हणून कसोटी, एकदिवसीय, T20 मध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय ठरला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *