Headlines

जाऊ बाई जोरात! जो जोनसला घटस्फोट दिल्यानंतर ‘या’ अभिनेत्यासोबत सोफी टर्नरचं लिप लॉक

[ad_1]

Sophie Turner Kiss : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सीरिजसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची जाऊ सोफी टर्नर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जो जोनस आणि सोफी टर्नर या दोघांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबातमीवर शिक्का मोर्तब केला. घटस्फोटानंतर जो जोनस अमेरिकेत टूर करत असताना त्याच्या दोन्ही मुलींचा सांभाळ करताना दिसत आहे. तर सोफी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीडोत Joan या शोचा को-स्टार फ्रॅंक डिलनला लिप लॉक करताना दिसली. 

फ्रँक डिलनच्या फेन पेजनं त्यांच्या एक्स अकाऊंट म्हणजेच आधीचं ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोफी आणि फ्रँक हे दोघेही किस करताना दिसत आहेत. सुरुवातीला सोफी पाण्यात जाते, त्यानंतर ती फ्रँकला देखील पाण्यात घेऊन येते. त्यानंतर सोफी फ्रँकवर पाणी उडवताना दिसते. तेच नंतर फ्रॅँक करतो… अखेर फ्रँक सोफीला जवळ घेतो आणि ते दोघं लिपलॉक करतात… त्यानंतर सोफी आणि फ्रँक हे दोघे ही समुद्र किनाऱ्यावर बसल्याचे दिसते.

Joan ही ITVX ची आगामी सीरिज आहे. यात सोफी ब्रिटिश ज्वेल थीफ जोन हॅनिंगटनची भूमिका साकारते. तर अभिनेता फ्रॅँक तिच्या पती बोइसी हॅनिंगटनची भूमिका साकारत आहे. या शोचं शूटिंग यंदाच्या वर्षी इंग्लंडमध्ये मे महिन्यात झाली. फ्रँक विषयी बोलायचे झाले तर ‘फियर द वॉकिंग डेड’ आणि ‘हॅरी पॉटर एंड द हाफ-ब्लड प्रिंस’ मध्ये असलेल्या भूमिकांसाठी ओळखला जातो. 

सोफी विषयी बोलायचे झाले तर तिनं आणि जो जोनसनं यंदाच्या वर्षीच घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नाच्या चार वर्षांमध्येच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्या दोघांना दोन मुली आहेत. सध्या जो जोनस त्या मुलींचा सांभाळ करत आहे. सोफी आणि जो हे 2019 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. 

हेही वाचा : फार्महाऊस का विकत घेतलंस? प्राजक्ता माळी म्हणाली ‘माझ्या प्रेमासाठी….’

सोफीनं HBO च्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या आठव्या सीझनमध्ये सेन्या स्टार्कची भूमिका साकारली होती. 2016 मध्ये ‘एक्स-मॅन: एपोकॅलिप्स’ आणि 2019 मध्य़े प्रदर्शिद झालेल्या ‘डार्क फीनिक्स’ मध्ये जीन ग्रेची भूमिका साकारली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *