Headlines

iron drum placed on railway route between Sandhurst and byculla railway stations in Mumbai

[ad_1]

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर लोखंडी ड्रम रुळावर टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे घातपाताचा कट उधळून लावण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. सँडहर्स्ट रोड ते भायखळा या रेल्वे स्थानकांदरम्यान दगड आणि गिट्टीने भरलेला हा लोखंडी ड्रम ठेवण्यात आला होता. या घटनेत खोपोली लोकलमधील प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे.

भाजपा, शिवसेना आणि मनसे मुंबई महापालिका एकत्र लढणार का? एका वाक्यात उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रेल्वे अधिकाऱ्यांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. रेल्वेच्या अभियंता विभागाकडून अशा प्रकारच्या ड्रमचा वापर कामानिमित्त करण्यात येतो. मात्र, हा ड्रम रुळावर कसा आला, याचा तपास आता केला जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : चार कोटी रुपयांचा गांजा जप्त ; एनसीबीची कारवाई

“सीएसएमटी स्थानकातून केपी-७ ही जलद लोकल खोपोलीच्या दिशेने १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी निघाली होती. या प्रवासादरम्यान मोटरमन अशोक शर्मा यांना भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर एक लोखंडी ड्रम आढळून आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत शर्मा यांनी वेळीच आपत्कालीन ब्रेक दाबले. मात्र, तरीही या लोकलने लोखंडी ड्रमला जोरदार धडक दिली. त्यानंतर काही अंतरावर ही ट्रेन थांबली. या घटनेदरम्यान परिसरात कर्नकर्कश आवाज झाला होता”, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली आहे. या घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांच्या मदतीने हा ड्रम रुळावरून हटवण्यात आला. या घटनेमुळे ही लोकल पाच मिनिटे उशिरा कल्याण स्थानकात पोहोचली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *