Headlines

IRCTC वरून तिकीट बुकिंग, मुंबईतील महिलेला ६४ हजाराचा गंडा, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी पाहा टिप्स

[ad_1]

नवी दिल्लीः How To Avoid Train Ticket Fraud: IRCTC ऑनलाइन वेबसाइट आणि अॅप द्वारे रेल्वेचे तिकीट बुक केले जावू शकते. हे काम पूर्णपणे ऑनलाइन प्रोसेसने होते. या ठिकाणाहून तुम्हाला रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी कुठेही लाइन लावायची गरज नाही. तुम्ही घरात बसून तिकीट बुक करू शकता. नुकतात एक फ्रॉड समोर आला आहे. एका महिलेची ६४ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
मुंबईतील एका महिलेला तीन तिकीट बुक करायचे होते. त्यामुळे तिने IRCTC वेबसाइट वरून तिकीट बुक केले होते. परंतु, तिची तिन्ही तिकीट RAC मध्ये बुक झाले होते. त्यानंतर तिने ट्विटरवर IRCTC ट्विटर हँडलला टॅग केले. तसेच सीट कन्फर्म करण्यासंबंधी विचारले. ट्विट केल्यानंतर महिलेला एक कॉल आला. ज्यात एका व्यक्तीने त्या महिलेला IRCTC ग्राहक कस्टमर केयर एग्जीक्यूटिव बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेला २ रुपयाचे पेमेंट करायला सांगितले. यानंतर त्या महिलेने ६४ हजार रुपये गमावले.

वाचाः उद्यापासून रिपब्लिक डे सेल; Kodak च्या Smart TV वर जबरदस्त डिस्काउंट, पाहा किंमत

फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा

  • जर तुम्ही ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करीत असाल तर कोणत्याही चुकीच्या वेबसाइटवर जावून तिकीट बुक करू नका. यासाठी अधिकृत वेबसाइटची निवड करा.
  • जर तुमचे RAC तिकीट आहे. तर त्याला कन्फर्म करण्यासाठी ट्विट करू नका.
  • जर तुम्ही एजन्टकडून तिकीट खरेदी करीत असाल तर त्याच एजन्टवर विश्वास ठेवा जे तुम्हाला नेहमी तिकीटसाठी मदत करतात.
  • आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे आपली कोणतीही खासगी माहिती पोस्ट करू नका. जर कोणी स्वतःला IRCTC चे एग्जीक्यूटिव असल्याचे सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. पिन नंबर किंवा अकाउंट नंबर शेअर करू नका. कोणालाही पेमेंट करू नका.

वाचाः Whatsapp वर आलेला १ मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवू शकतो थेट जेलमध्ये, ही चूक करू नका वाचाः १ लाखाच्या Sony Bravia 55 Inch LED TV वर मोठा डिस्काउंट, येथून खरेदी करा फक्त २४ हजारात

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *