Headlines

IRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक करताना ही चूक करु नका, सर्व बँक खातच होईल रिकामं!

[ad_1]

नवी दिल्ली :IRCTC Tips for Online railway Booking : भारतीय रेल्वेकडून एक महत्त्वाची सूचना सर्वांना देण्यात आली आहे. ज्यात ‘irctcconnect.apk’ हे ॲपडाऊनलोड करु नये असं सांगतिलं गेलं आहे. हे ॲपव्हॉट्सॲप, टेलिग्राम अशा प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरुन पाठवलं जात आहे. दरम्यान आयआरसीटीसीनं सांगितल्याप्रमाणे हे ॲप तुमच्या फोनसाठी धोक्याचं असून हे इन्स्टॉल केल्यास तुमचा फोनतर खराब होईलच तसंच फोन हॅक होऊन तुमचं बँक अकाउंटच लुटलं जाऊ शकतं असंही म्हटलं गेलं आहे.

तर या ॲपमधून काही लोक हे भारतीय रेल्वेच्या नावाने बोलून तुमची महत्त्वाची व्यक्तीगत माहिती घेतात. त्यातून UPI डिटेल्स आणि इतर महत्त्वाचे बॅकिंग डिटेल्स घेऊन तुमचं अकाउंट लुटू शकतात. त्यामुळे या धोक्यापासून वाचण्याकरता हे ॲपच डाऊनलोड न करण्याची सूचना भारतीय रेल्वेनं दिली आहे.

वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

कसं ठेवाल स्वत:ला सुरक्षित?
तर सर्वात आधी म्हणजे हे ॲप कुठूनही तुम्हाला पाठवलं गेलं तर ते तुम्ही इन्स्टॉलस करता कामा नये. तसंच त्याआधीच तुम्ही Google Play Store किंवा Apple Store मधून ‘IRCTC Rail Connect’ हे ओरिजनल ॲप डाऊनलोड करु शकता. तसंच आयआरसीटीसी कधीच ग्राहकांना पिन, ओटीपी, पासवर्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स विचारत नाही हे देखील सांगितलं आहे.

वाचा :Google ला मोठा झटका, सॅमसंग, ॲपल डिफॉल्ट ब्राउजर हटवणार, ‘हे’ आहे कारण

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *