Headlines

IPL Mini Auction: ‘ही’ 5 नावं लक्षात ठेवा, यांच्यावर पडणार पैशांचा पाऊस?

[ad_1]

IPL 2023 Auction: इंडियन प्रीमीयर लीगचे (IPL 2023) आत्तापर्यंत 15 हंगाम पूर्ण झाले असून आता पुढीलवर्षी 16वा आयपीएल हंगाम खेळवला जाणार आहे. पण त्याआधी उद्या (2  डिसेंबर) आयपीएलच्या या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. मात्र या लिलावापूर्वीच मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेले सुरेश रैना (suresh raina) याने आयपीएलबाबत (IPL 2023 Auction) मोठी भविष्यवाणी केली आहे. या 2023 च्या  2023 च्या आयपीएल लिलावादरम्यान तो JioCinema तज्ञांच्या पॅनेलचा भाग असेल. आता मिनी लिलावापूर्वी त्याने त्या 5 खेळाडूंची नावे दिली आहेत, ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होऊ शकतो. जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल… 

 रैनाने या खेळाडूंची नावे घेतली

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (suresh raina) जिओ सिनेमावर म्हणाला, एन जगदीसन (Narayan Jagadeesan) हा खूप खोलवर फलंदाजी करतो. तो खूप हुशार आणि उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने तामिळनाडूसाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे इतर खेळाडूंनी त्याच्यापासून सावध रहा. त्याचवेळी जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) नुकतीच विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) जिंकली असून त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे.

वाचा : आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार ‘हा’ संघ, RCB आणि KKR…, जाणून घ्या यामागचे कारण 

वेगवान गोलंदाज उनाडकटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 3.33 च्या इकॉनॉमी रेटने 10 सामन्यांत 19 बळी घेतले. तर जगदीशनने तामिळनाडूसाठी सलग पाच शतके झळकावली. ज्यातील शेवटच्या सामन्यात अरुणाचल प्रदेश विरुद्ध विक्रमी 277 धावा केल्या होत्या.

इंग्लंडच्या या खेळाडूंवर मोठी बोली लावली जाऊ शकते

पुढे बोलताना सुरेश रैना म्हणाला, ‘सॅम करनने इंग्लंड आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्सने आपल्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाची कमान उत्तम पद्धतीने हाताळली आहे. तो असा अष्टपैलू खेळाडू आहे. जो कधीही खेळ बदलू शकतो. इंग्लंडला T20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात सॅम कुरनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 13 विकेट्स घेतल्या आणि मॅन ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळवला.

आयर्लंडच्या जोशुआ लिटलने टी-20 विश्वचषकात शानदार कामगिरी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत 11 विकेट घेतल्या. सुरेश रैना म्हणाला, ‘आयर्लंडच्या जोशुआ लिटलकडे पहा. त्याने नुकत्याच विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. मी त्याच्यासोबत खेळलो आहे. अशी माहीती सुरेश रैना याने दिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *