Headlines

IPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा

[ad_1]

IPL 2024 Shah Rukh Khan Somking : आयपीएल 2024 ची सुरुवात झाली आहे. त्यातील तीन सामने सध्या पार पडले आहेत. त्यातील काल कोलकाता नाइट राइडर्सच्या टीमनं 4 रन्सनं विजेता ठरले. मात्र, शाहरुख खानला हा सामना महागात पडला आहे. त्याचं कारण म्हणजे तो मॅच पाहण्यासाठी जेव्हा ईडन गार्डन्समध्ये पोहोचला होता. या दरम्यान, तो कॅमेऱ्यासमोर स्मोक करता कॅप्चर झाला. शाहरुख खानला स्मोकिंग करतानाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

शाहरुख हा केकेआरचा मालक आहे. तो सुरुवातीला येऊन केकेआरच्या सगळ्या खेळाडूंना भेटला. फक्त इतकं नाही तर तो त्यांच्या ग्राउंड स्टाफला देखील भेटला. या सगळ्यात त्याचा स्मोकिंग करतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे खरंतर त्याच्या समस्या वाढू शकतात. खरंतर, शाहरुख यावेळी खरंच स्मोकिंग करत होता की नाही याचा कोणताही पुरावा नाही आहे. त्यामुळे फक्त या व्हायरल व्हिडीओमुळे सुरु असलेल्या चर्चेवर किती विश्वास ठेवायचा हे सांगता येणं शक्य नाही. 

हे पहिल्यांदा नाही जेव्हा क्रिकेट स्टेडियममध्ये शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याआधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ग्राउंड स्टाफसोबत वाद झाला होता. त्यामुळे शाहरुख वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यासाठी त्याला पाच वर्ष बॅन करण्यात आलं होतं. तर आता ईडन गार्डन्समध्ये त्यानं स्मोकिंग करण्यावर बंगाल क्रिकेट असोसिएशन कोणती अॅक्शन घेणार, याविषयी अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

काल केकेआर आणि सनराइजर्समध्ये आयपीएल 2024 चा हा तिसरा सामना होता. या मॅचमध्ये सनराइजर्सचा कॅप्टन पॅट कमिंसनं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरनं फलंदाजी करत सुरुवात केली. पण त्यांच्या फलंदाजीची सुरुवात काही खास ठरली नाही, मात्र, आंद्रे रसेलच्या जबरदस्त फलंदाजीनं टीमला 208 रनचा स्कोर केला. त्याशिवाय दजेव्हा सनराइजर्स हेनरिक क्लासेननं केलेल्या अर्ध शतकानंतरही त्यांनी 20 ओव्हरमध्ये 204 रन केले. 

हेही वाचा : Swatantrya Veer Savarkar Day 2: रणदीप हुड्डाच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

दरम्यान, यावेळी शाहरुखला स्टेडियममध्ये आल्याचं पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. शाहरुखचे स्टेडियममधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या अॅन्गलं त्याचे व्हिडीओ काढले. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *