Headlines

IPL 2022, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला या 3 स्टार खेळाडूंना सोडल्याचा पश्चाताप

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार 26 मार्चपासून सुरु होणार आहे.  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे.  मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईच्या या यशाचं गमक म्हणजे टीम मॅनेजमेंटने खेळाडूंवर वेळोवेळी दाखवलेला विश्वास. मुंबईच्या ‘पलटण’मध्ये अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या, जस्प्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि यासारख्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. (ipl 2022 in india most sucess team mumbai indians yuzvendra chahal glenn maxwell and chris lynn)

मात्र मुंबईने काही खेळाडूंवर फारसा विश्वास दाखवला नाही. त्यामुळे आता हे खेळाडू दुसऱ्या संघाकडून खेळत आहेत. हे खेळाडू नक्की कोण आहेत, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

युजवेंद्र चहल  

युजवेंद्र चहल टीम इंडियाचा आघाडीचा फिरकी बॉलर. चहलने आपल्या फिरकीची जादू अनेकदा दाखवली आहे. चहल आयपीएलमध्ये बंगळुरुकडून खेळण्याआधी मुंबईसाठी खेळायचा. चहल 2011 ते 2013 दरम्यान मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे.

मात्र या दरम्यान चहलला फक्त एकदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने एकही विकेट न घेता 34 धावा लुटवल्या होत्या.     

चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 114 सामन्यात 139 विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्र या 15 व्या मोसमात राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे.  

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचं नाव हे टॉप 10 बॅट्समनमध्ये घेतलं जातं. मॅक्सवेल बॅटिंगसह बॉलिंगही करतो. मॅक्सवेलमध्ये सामन्याचा निकाल एकहाती पालटण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या या ऑलराऊंडर खेळाडूला मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये आपल्या ताफ्यात घेतलं होतं. 

मॅक्सवेलला या मोसमात फक्त 3 सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली. यानंतर फ्रँचायजीने मॅक्सवेलला रिलीज केलं. त्यानंतर मॅक्सवेलने नव्या टीमसह आयपीएलमधील पुढील वाटचालीस सुरुवात केली. मॅक्सवेल यानंतर पुढील मोसमात ‘वॅल्युएबल प्लेअर’ ठरला.  

ख्रिस लिन 

ख्रिस लिन गोलंदाजाचा कर्दनकाळ. मुंबईने ख्रिस लीनला  2020 मध्ये आपल्या गोटात घेतलं होतं. मात्र मुंबईने ख्रिसला कधीही मॅचविनर खेळाडू म्हणून विश्वास दाखवला नाही.

इतकंच कशाला, लीनला त्या मोसमात एकाही सामन्यात खेळण्याची संधीही दिली नाही. त्यानंतर 2021 मध्ये म्हणजेच  14 व्या मोसमात लीनला क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितीत खेळण्याची संधी मिळाली. लीनने या संधीचं  सोनं केलं. लीन अपेक्षांवर खरा उतरला. मात्र यानंतरही मुंबईने त्याला खेळण्याची संधी दिली नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *