Headlines

इंटिमेट सीनमध्ये नजरा वळवणाऱ्या अभिनेत्रीला लठ्ठपणामुळे जेव्हा वाईटातला वाईट दिवस पाहावा लागतो…

[ad_1]

Four More Shots please : प्रसिद्धी, पैसा आणि इतरही बऱ्याच सुखसोयी मिळणाऱ्या कलाकारांकडे पाहिलं की आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. यांना काय, खोऱ्यानं पैसे ओढतात हे… असं म्हणत आपण नकळतच या सेलिब्रिटींबाबत कमेंट्सही करतो. पण, खरंच असं बोलणं कितपत योग्य? कारण ही कलाकार मंडळी अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करतात ज्याचा आपण विचारही केला नसेल. किंवा अनेकदा तुमच्याआमच्यासोबत घडतात तेच प्रसंग या कलाकांच्यापुढेही वाढून ठेवलेले असतात. फक्त परिस्थिती काय ती वेगळी असते.

Four More Shots please, ‘ट्रिपलिंग’ अशा वेब सीरिजमुळे (Web series) प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मानवी गग्रू (maanvi gagroo) हिनं नुकतंच तिच्यासोबत घडलेल्या काही अशा प्रसंगांचा उल्लेख केला, ज्यामुळं कलाजगताची एक वेगळी बाजू समोर आली.

तुम्हाला कधी कोणी वाढलेल्या वजनावरून वगैरे हिणावलंय? (Body shamming ) मानवीलाही हिणावलंय. बरं, तेसुद्धा या कलाजगतात. या विश्वात येण्यापूर्वी आपल्या स्थूलतेविषयी तिला कधीच जाणिव नव्हती, तोपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण, लठ्ठपणा पाहून तुझ्यासाठी कोणत्याच भूमिका नाहीत, असं दिग्दर्शक आणि इतर काही व्यक्तींकडून तिनं ऐकलं आणि ती थबकली.

‘त्यांना कोणत्याही भूमिकेसाठी माझी निवड करता येत नव्हती कारण मी जाड होते. बरं जाड भूमिकेसाठीही त्यांना माझी निवड करायची नव्हती, कारण मी एकदमही लठ्ठ नव्हते. तेव्हा मला जाणीव झाली की, आपण खरंच लठ्ठ आहोत आणि आता वजन कमी करायची वेळ आली आहे.’

काळ पुढे गेला आणि अखेर मानवीनं पुन्हा एकदा आपण जसे आहोत तसेच आहोत असं म्हणत स्वत:चा, स्वत:च्या शरीराचा स्वीकार केला. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘फोर मोर शॉर्ट्स प्लीज’ या वेब सीरिजच्या नव्या पर्वातही मानवी झळकली.

Maanvi Gagroo | Zee News

‘सिद्धी’ हे एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलीचं पात्र तिनं यामध्ये साकारलं. गडगंज पैसा असूनही प्रेमाच्या, स्वत:च्या शोधात असणारी ही सिद्धी कशा चुका करते, त्यातून कशी सावरते आणि या साऱ्यामध्ये मैत्रिणींची साथ तिला कशी मिळते याभोवती हे पात्र फिरतं. सध्या या सीरिजबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *