Headlines

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त’ शिक्षक खुर्शिद कुतुबुद्दीन शेख यांची उद्या मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शिद कुतुबुद्दीन शेख यांची ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन एअर या ॲपवर शनिवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र आरेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, असरअल्ली,ता.सिरोंचा,जि.गडचिरोली या अतिशय दुर्गम अशा भागात शिक्षक म्हणून केलेले काम, राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या भावना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनाशी जोडण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह, आनंददायी शिक्षण, कोरोना कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रम, शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांचा या उपक्रमांना लाभत असलेला प्रतिसाद, विद्यार्थी आणि शिक्षकांना केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. शेख यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *