Headlines

“पारंपारिक पोषाखात इतका घाणेरडा…,” दाक्षिणात्य संस्कृतीचा अपमान म्हणत भारतीय क्रिकेटर सलमान खानवर संतापला

[ad_1]

Indian Cricketer on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या ‘किसी का भाई, किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jan) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज झालेला नाही. मात्र चित्रपटातील गाणी सध्या धुमाकूळ घालत आहेत. चित्रपटातील अनेक गाणी रिलीज झाली असून त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच चित्रपटातील Yentamma गाणं रिलीज झालं असून, यामध्ये दाक्षिणात्य पद्धतीने वेशभूषा आणि डान्स दाखवण्यात आला आहे. दरम्यान या गाण्यातील डान्सवर माजी भारतीय क्रिकेटरने नाराजी जाहीर करत संताप व्यक्त केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी Yentamma गाण्यावर प्रचंड नाराजी जाहीर केली आहे. या गाण्यात सलमान खानसबोत दाक्षिणात्य अभिनेता वेंकटेश आणि राम चरणही आहेत. गाण्यात सलमान आणि वेंकटेश पारंपारिक पोषाखात दाखवण्यात आले आहेत. मात्र गाण्यात धोतीचा ज्याप्रकारे वापर करण्यात आला आहे त्यावरुन लक्ष्मण यांनी नाराजी जाहीर केली आहे. 

लक्ष्मण शिवरामकृष्णन भारताकडून 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सलमान खानच्या गाण्यावर टीका करताना त्यांनी हे फारच घृणास्पद असून, दाक्षिणात्य संस्कृतीचा अपमान करणारं असल्याचं म्हटलं आहे. 

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले आहेत की “हे फारच घृणास्पद असून, दाक्षिणात्य संस्कृतीचा अपमान करणारं आहे. ही लुंगी नाही तर धोती आहे. एका पारंपारिक पोषाख जो अत्यंत चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे”.

Yentamma गाणं विशाल ददलानी आणि पायल यांनी गायलं आहे. यामध्ये रॅपचाही वापर करण्यात आला असून रफ्तार याने ते गायलं आहे. हे गाणं शब्बीर अहमदने लिहिलं असून, पायल देवने संगीतबद्ध केलं आहे. 9 एप्रिलला हे गाणं रिलीज केलं जाणार आहे. 

सलमान खानचा ‘किसी का भाई, किसी की जान’ चित्रपट ईदला प्रदर्शित केला जाणार आहे. सलमानचा याआधीचा राधे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. पण पठाण चित्रपटातील त्याच्या कॅमिओमुळे चाहत्यांना त्याच्या नव्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. 

चित्रपटात सलमानसह वेंकटेश, पूजा हेगडे, जगपती बापू यांच्यासह कलाकारांची फौज आहे. मे 2022 ला या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली होती. 21 एप्रिलला ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *