Headlines

India vs Srilanka : टी20 सामन्यात कोण वरचढ? टीम इंडिया की श्रीलंका, जाणून घ्या

[ad_1]

दुबई : युएईमध्ये सुरु असलेल्या आशिया कपमध्ये (Asia cup 2022) आज टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) आमने सामने येणार आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी (Team India)  ‘करो या मरो’ साऱखा असणार आहे. टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे. दरम्यान आतापर्यंत टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL)  किती वेळा आमने सामने आले आहेत. या सामन्यात कोण वरचढ ठरलाय ते जाणून घेऊयात. 

टीम इंडियासाठी (Team India) आजचा सामना खूप महत्त्वाचा असेल. कारण स्पर्धेत टिकण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे. जर टीम इंडियाचा पराभव झाला तर फायनलचा मार्ग कठीण होईल. दुसरीकडे, लंकन संघाने अफगाणिस्तानकडून सुपर-4 फेरीतील एक सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.

दोन्ही संघाचा फॉर्म काय सांगतो?
भारताने यावर्षी 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 18 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. एक सामना निष्फळ ठरलाय. दुसरीकडे, लंकन संघाने यावर्षी खेळलेल्या 14 टी-20 पैकी फक्त 4 जिंकले आहेत. तर 9 सामन्यात पराभव झाला आहे. श्रीलंकेचा एक सामना अनिर्णित राहिला आहे.

हेड टू हेड सामने 
टीम इंडिया आणि श्रीलंकेत आतापर्यंत 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 17 सामने जिंकले आहेत, तर 7 सामने श्रीलंकेच्या पारड्यात पडले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. यावर्षी दोन्ही संघांमध्ये खेळले गेलेले तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाचे लंकन संघावर आकडेवारीचे पारडे जड आहे, असे म्हणता येईल.

दरम्यान आकडेवारी पाहता टीम इंडिया श्रीलंकेवर वरचढ ठरली आहे. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियाचं जिंकेल अशी अपेक्षा भारतीय फॅन्स करतायत.   

टीम इंडिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल,भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल

श्रीलंका संभाव्य प्लेईंग इलेव्हन 
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकिपर), चरित अस्लंका, दानुष्का गुनाथिलक, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चामिका, महिषा टेकश्ना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *