Headlines

India Vs Pakistan: शेवटच्या ओव्हरमध्ये Dot Ball खेळणाऱ्या हार्दिक पंड्याच्या मिलियन डॉलर Recation चा Video Viral

[ad_1]

Asia Cup 2022: रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान, या दोन्ही सामन्यांमध्ये खेळवल्या गेलेल्या ब्लॉकबस्टर सामन्यात विरोधी संघाला भारतानं 5 विकेट्सनं पराभूत केलं. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या तुफानी फटकेबाजीपुढे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. (India Vs Pakistan)

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत सान्यात 19.5 ओव्हरमध्ये 147 रन्स केले. भारतीय संघानं या लक्ष्याचा सामना करत मैदान गाठलं, पण त्यांची सुरुवात फारशी चांगली नव्हती. संघ कोलमडत असतानाच पंड्या आणि जडेजा यांनी मात्र दमदार खेळ दाखवत जबाबदारीची भूमिका बजावली. 

अखेरच्या ओव्हरमध्ये जडेजा 35 धावांवर बाद झाला. पण, पंड्यानं मात्र विजयी Six लगावत Team India ला विजय मिळवून दिला. 

शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? 
भारताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 7 रन्सची आवश्यकता होती. त्याचवेळी मोहम्मद नवाज यानं पहिल्याल बॉलवर जडेजाला माघारी धाडलं. यानंतर तिसऱ्या बॉलवर पंड्यानं जोरदार पटका मारला खरा, पण फिल्डर असल्यामुळं त्याला एकही Run करता आला नाही. तिथं दुसऱ्या End ला असणाऱ्या दिनेश कार्तिकच्या चेहऱ्यावर असणारी चिंता वाढत गेली. 

भारताला आता विजयासाठी 3 Ball 6 Runs अशी मजल मारायची होती. त्याच क्षणी पंड्यानं कार्तिककडे पाहत अशी काही प्रतिक्रिया दिली, की पाहणारेही त्याच्या आत्मविश्वासाची दाद देऊ लागले. 

नेटकऱ्यांनी तर, Hardik Pandya ची रिअॅक्शन पाहून, आपल्याला ‘मिर्झापूर’ या सीरिजमधील  ‘कालीन भैय्या’च आठवल्याचं म्हटलं. काहींनी तर लगेचच तसे मीम्सही व्हायरल केले. कारण, त्याच्याच पुढच्या बॉलवर हार्दिकनं Six ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता. सध्या या ब्लॉकबस्टर सामन्याचे Highlights नेटकरी वारंवार पाहताना दिसत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *