Headlines

‘भारत जोडो’ यात्रेचे राष्ट्रवादी कडून स्वागत; १० नोव्हेंबरला नेते होणार सहभागी | NCP Welcomes Bharat Jodo Yatra Leaders will participate on November 10 msr 87

[ad_1]

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ५५ दिवस ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

भारत जोडो या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजीमंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय जाहीर सभेतही उपस्थित राहणार असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन केले आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. आज या पदयात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. नांदेडमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने या यात्रेचे पेटत्या मशाली घेऊन भव्य स्वागत करण्यात आले आहे. या यात्रेला देशातील अनेक राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दिला असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील स्वागत-नियोजनाचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

यात्रेच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, नसीम खान यांच्यासह अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे १० नोव्हेंबर रोजी नांदेडमधील सभेमध्ये सहभागी होणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *