Headlines

India Australia Women T20 मालिका आजपासून, कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

[ad_1]

India Australia Women T20 Series:  भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला (IND-W vs AUS-W) क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील (D Y Patil Sports Stadium) मैदानावर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे. तर अन्य तीन सामने मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडीयमवर येत्या 14, 17 आणि 20 तारखेला होणार आहेत. आशिया चषक जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team India) पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅट खेळणार आहे. तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऐतिहासिक सुवर्ण जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच टी-20 खेळण्यासाठी कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर आला आहे.

या सामन्यात संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur ) आणि उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच जेमिमा रॉड्रिग्जदेखील संघात पुनरागमन केल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तसेच अष्टपैलू देविका वैद्यला आठ वर्षांनंतर ट्वेन्टी-20 संघात स्थान मिळाले आहे. रेणुका सिंह ठाकूर व दीप्ती शर्मा या दोघींवर गोलंदाजीची कमान असणार आहे, तर दुसरीकडे एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.  

वाचा : विश्वचषकपूर्वी टीम इंडिया मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर  

IND-W vs AUS-W 1st T20 थेट कशी पाहायची?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND-W vs AUS-W) यांच्यातील या 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील संपूर्ण सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, तर तुम्ही हॉटस्टारवर लाइव्ह (hotstar live) सामन्यांचा आनंदही घेऊ शकता.

भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवानी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा आणि एस. हरलीन देओल.  

ऑस्ट्रेलियन संघ

एलिसा हिली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डी’आर्सी ब्राउन, निकोला केरी, ऍशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी, एलिसा पेरी, मेग शट आणि अॅनाबेल सदरलँड.

वेळ : सायं. 7 वा. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स फर्स्टवर हा सामना पाहता येणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *