Headlines

IND vs BAN 3rd ODI: मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कशी असेल Playing XI?

[ad_1]

Ishan kishan, Rahul Tripathi in Practice Session: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात तिसरा आणि अखेरचा सामना चटगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियम खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून (IND vs BAN 3rd ODI) मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात बांग्लादेशने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे आता भारताला मालिका देखील गमवावी लागली आहे. अशातच आता अखेरचा सामना जिंकण्यासाठी राहूल अँड कंपनी नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. (India vs Bangladesh 3rd odi practice session at chattogram focus on ishan kishan rahul tripathi)

शुक्रवारी सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, सर्वांचं लक्ष फक्त 2 खेळाडूंवर टिकून राहिलं होतं. नेटमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांच्यावर विशेष लक्ष देण्यात आलं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दुखापतीमुळे या दोघांपैकी एकाला के एल राहुलसोबत (KL Rahul) सलामीची संधी मिळू शकते.

भारतीय संघात नंबर तीनसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपली जागा पक्की केली आहे. नंबर तीनवर खेळताना विराटने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विराट फॉर्मात असल्यास कोणत्याही टीमसमोर, कोणत्याही गोलंदाजासमोर तो धावा करु शकतो.

आणखी वाचा – IND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर…

दरम्यान, गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असेल. त्याचबरोबर अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) देखील हुकमी एक्का ठरू शकतो.  सध्या टीम इंडियाचे रोहित शर्मा (Rohit Sharma), कुलदीप सेन (Kuldeep Sen), दीपक चहर (Deepak Chahar) हे खेळाडू जखमी आहेत.

संभाव्या प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *