Headlines

IND W vs ENG W: याला म्हणतात ‘परफेक्ट विकेट’..Renuka Singh च्या बॉलिंगवर ऋचाचा अविश्वसनीय कॅच, पाहा Video

[ad_1]

IND W vs ENG W: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (ICC Women’s T20 World Cup) पहिले दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाची महिला ब्रिगेड इंग्लडंशी (India Vs England) दोन हात करत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची धार पहायला मिळाली. भारताची स्टार बॉलर रेणुका शर्माने (Renuka Sharma) घातक गोलंदाजी करत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. तिसऱ्या चेंडूवरच इंग्लिश संघाला मोठा धक्का दिला आणि डॅनी वॉटला (Danny Watt) खातेही न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) इंग्लंडविरुद्ध टॉस जिंकला. त्यानंतर तिने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यासाठी टीम इंडियामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. देविका वैद्य यांच्या जागी शिखा पांडेला स्थान मिळालं आहे.

Renuka Singh ची घातक गोलंदाजी

रेणुका सिंगने (Renuka Singh) अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या 3 षटकात 3 गडी बाद केले. तर सामन्यात तिने 5 गोलंदाजांना तंबूत पाठवले. रेणुकाने पहिल्याच षटकापासून गोलंदाजीला धडाकेबाज सुरुवात केली होती.

पाहा Video – 

रेणुकाने पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकताच डेनीने बॉल (Danny Watt Wicket) प्लेस करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या कट लागला आणि विकेटच्या मागे उडाला. येथं, विकेटकिपर ऋचा घोषने (Richa Ghosh) परफेक्ट कॅच (Perfect catch) घेतला. ढाय्य टाकत एका हाताने कॅच घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

आणखी वाचा – Virat Kohli : संतापलेल्या विराटला Rohit Sharma ने केलं शांत; ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन – 

टीम इंडिया: शेफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (C), ऋचा घोष (WK), शिखा पांडे, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका ठाकुर सिंह

इंग्लंड: सोफिया डंकले, डेनियल याट, एलिस कैप्सी, नताली स्कीवर, हीथर नाइट (C), एमी जोन्स (WK), कैथरीन स्कीवर, सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *