Headlines

Ind Vs Zim 3rd ODI: दिपक हूडाचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडियासाठी ठरतोय लकीचार्म

[ad_1]

हरारे : तिसरा वनडे सामना जिंकून टीम इंडियाने (team india) झिम्बाब्वेला व्हाईट व्हाश दिला आहे. कर्णधार के एल राहूलच्या नेतृत्वाखाली संघाने हा पराक्रम केला आहे. या पराक्रमासह टीम इंडियाचा (team india)  ऑलराऊंडर दिपक हूडाने (deepak hooda) एक विशेष रेकॉर्ड  केला आहे. विशेष म्हणजे निव्वळ एका धावावर बाद झालेल्या दिपक हुडाने (deepak hooda)  वर्ल्ड रेकॉर्ड (world record) कसा केला असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सतावतोय आहे. त्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड नेमका कसा झालाय? दिपक हूड्डाने (deepak hooda) हा रेकॉर्ड कसा केलाय? ते जाणून घेऊयात.  (zim vs ind 3rd odi match team india deepak hooda makes world record and become 1st player who wins most 17 consecitve matchs since debut against zimbabwe at harare)

टीम इंडियाचा ऑल राऊंडर दिपक हूंडा (deepak hooda)  सध्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावताना दिसत आहे. आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने त्याने निवडकर्त्यांचे देखील लक्ष वेधले आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळतेय. अशीच संधी त्याला झिम्बाब्वे दौऱ्यातही मिळाली. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह चांगले योगदान दिले. त्याने हरारे येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 36 चेंडूत 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि गोलंदाजीत दोन ओव्हरमध्ये सहा धावा देत शॉन विल्यम्सची मोठी विकेट घेतली. तर तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात त्याला खास प्रदर्शन करता आले नाही. अवघ्या 1 धावावर तो बाद झाला. तर बॉलिंगमध्येही त्याला खास कामगिरी करता आली नाहीए.  

सामना’वीर’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दिपक हुड्डा (deepak hooda)  मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचा सातत्यपूर्ण भाग आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याच महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी20 मध्ये पदार्पण केले. 

दिपक हुडाच्या (deepak hooda)  विश्वविक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, पदार्पणापासूनच त्याने खेळलेले सर्व सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. दीपकने पदार्पण केल्यापासून एकूण 17 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व भारताने जिंकले आहेत. दीपक हुडाच्या प्लेइंग-11 मध्ये असताना भारतीय संघाने 8 वनडे आणि 9 टी-20 सामने जिंकले आहेत. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासूनची एखादा संघ सर्वांधिक वेळा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.आतापर्यतं हा रेकॉर्ड कोणत्याच खेळाडूच्या नावावर झाला नाही आहे. त्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड ठरलाय.  

रोमानियाच्या खेळाडूला टाकले मागे 
दिपक हूड्डाच्या (deepak hooda)  आधी डेब्यू सामन्यानंतर सर्वाधिक वेळा सामना जिंकण्यात रोमानियाच्या सात्विक नादिगोटचा समावेश होता. त्याने डेब्यू केल्यानंतर संघाने 15 सामने जिंकले होते. दिपक हूड्डाने या खेळाडूला मागे टाकले आहे. झिम्बाब्वे विरूद्ध दुसरा सामना जिंकल्यानंतर त्याने सात्विकला मागे टाकले होते. कारण या विजयानंतर दिपक हूड्डाच्या नावे 16 विजय झाले होते. 

डेब्यूनंतर सलग विजय

  • दिपक हुड्डा (भारत) – सलग 17 विजय
  • सात्विक नादिगोटला (रोमानिया)- सलग 15 
  • डेविड मिलर (दक्षिण अफ्रीका)- सलग 13 
  • शांतनु वरिष्ठ (रोमानिया) – सलग 13 
  • के. किंग (वेस्टइंडीज) – सलग 12 

दरम्यान हा रेकॉर्ड दिपक हूड्डासाठी (deepak hooda)  खुप खास आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केल्यापासून टीम इंडियाने सलग 17 विजय मिळवला आहे. एखादा खेळाडू संघात सामील झाल्यापासून 17 वेळा संघ जिंकल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे दिपक हूड्डासाठी हा विशेष रेकॉर्ड आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *