Headlines

IND vs PAK: “तू फिरसे आ गयी”; ऋषभ पंतच्या फ्लॉप शोमुळे उर्वशी होतेय ट्रोल

[ad_1]

आशिया कप 2022 (Asia Cup 2022 ) च्या सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पाकिस्तानविरुद्ध काही कामगिरी करु शकला नाही. रविवारी दुबईत झालेल्या या सामन्यात लेगस्पिनर शादाब खानने त्याला 14 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंतने 12 चेंडूत 14 धावा करत 2 चौकार मारले.

 ऋषभ पंत आऊट झाल्यावर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ट्रोल होऊ लागली आहे. याआधीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंत खेळला नव्हता. मात्र या सामन्यात उर्वशी उपस्थित होती. त्यावेळीही ती ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये होती.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 54 धावांची खेळी केली. मात्र 131 धावांपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने 16 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावा केल्या तर राहुलने 20 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 28 धावा केल्या. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

मात्र पंतही काही दमदार कामगिरी करु शकला नाही. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत 14 धावा करून बाद झाला. डावाच्या 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला शादाब खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 

चाहत्यांना पंतकडून खूप आशा होत्या पण तो त्या पूर्ण करू शकला नाही. मात्र, उर्वशी रौतेला पंतसोबत सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली. गेल्या सामन्यादरम्यानही ती स्टेडियममध्ये दिसली होती. यावरुनच आता मीम्सची लाट आली आहे.

जेव्हा ऋषभ पंत फलंदाजीसाठी येतो:-
तेव्हा :- उर्वशी रौतेला

जेव्हा उर्वशी रौतेला स्टेडियमध्ये येते तेव्हा ऋषभ पंत 

उर्वशीला पुन्हा स्टँडमध्ये पाहिल्यानंतर पंत

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीनं एका क्रिकेटरला डेट करत असल्याचा दावा केल्यानंतर उर्वशी आणि ऋषभ पंत यांची नावं जोडली जाऊ लागली होती. मात्र, ऋषभनं अशा सर्व बातम्यांचे खंडन केले आणि उर्वशीला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर ब्लॉकही केले होते. मात्र दोघेही एकमेकांचे नाव न घेता बेछुट आरोप करत सुटले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *