Headlines

Ind vs Pak : पाकिस्तानने 23 ऑक्टोबरचा सामना खेळू नये, दिग्गज क्रिकेटरचे मोठे विधान

[ad_1]

पर्थ : Ind vs Pak टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या सामन्यावर आधीच पावसाचे संकट आहे. त्यात आता या सामन्यावर आणखीण एक मोठं संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना आता रद्द होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मात्र जर हा सामना रद्द झाला तर क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता या सामन्यावर नेमक कोणत संकट ओढवणार आहे, हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : IND vs PAK: टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने पाकिस्तानची उडवली झोप, माजी कर्णधारही घाबरला 

खर तर बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बुधवारी एक मोठ विधान केले होते. टीम इंडिया (Team India) 2023 ला होणाऱ्या आशिया कपसाठी (Asia Cup) पाकिस्तानला जाणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होते. या विधानानंतर पाकिस्तानचा चांगलीच मिर्ची झोंबली होती. जय शाह यांच्या विधानानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि सईद अन्वरसह अनेक दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया देत बीसीसीआय़च्या भूमिकेवर संताप व्यक्त केला होता. 

…तर आम्हीही भारतात वर्ल्ड कप खेळणार नाही? 

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर युनूस खान (Younis Khan) या प्रकरणावर एका न्यूज चॅनेलशी बोलताना म्हणाला की, ‘जय शाह यांनी असे बोलायला नको होते. मी पीसीबीला या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन करेन. तसेच जर बीसीसीआय (bcci) त्यांच्या निर्णयावर ठाम असतील तर आम्हालाही त्यात काही फरक पडू नये. जर भारतीय संघ आशिया कप खेळला नाही तर पुढच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपणही भारतात जाऊ नये, असा इशाराच त्याने दिला आहे.यासह तटस्थ ठिकाणी आशिया चषक आयोजित करण्याची तयारी असू नये, असेही त्याने म्हटलेय. 

पाकिस्तान 23 ऑक्टोबरचा सामना खेळणार नाही

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर कामरान अकमलने (kamran akmal) देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कामरान अकमल म्हणाला, जय शाह (Jay Shah) यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. अलीकडेच त्यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामना स्टेडियममध्येच पाहिला होता. मला वाटते की त्यांनी खेळाला राजकारणात आणण्यापासून परावृत्त केले पाहिजे, असा तो म्हणालाय. 

कामरान (kamran akmal) पुढे म्हणाला की, आशिया कप फक्त पाकिस्तानातच व्हायला हवा, असा विश्वास त्याने व्यक्त केला. तसेच तसे न झाल्यास पाकिस्तानने भारताविरुद्ध कुठेही सामना खेळू नये. मग ते आयसीसी स्पर्धा असो, आशिया चषक असो किंवा 23 ऑक्टोबर रोजी होणारा पुढील सामना असो, असा इशाराच त्यांनी बीसीसीआयला दिला आहे. 

दरम्यान आधीच पावसाचे सावट त्यात आता पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटर्सनी 23 ऑक्टोबरला सामना रद्द करण्याची केलेली मागणी, यामुळे पुन्हा एकदा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सची निराशो होणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *