Headlines

IND vs PAK : …म्हणून विराटला चेस मास्टर म्हणतात, त्याचे मैदानावरचे आकडेच सांगतात

[ad_1]

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप (t20 World Cup) सामन्यात टीम इंडियाने (Team India) रविवारी पाकिस्तानवर 4 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला आहे. 
विराटने 82 धावांची नाबाद खेळी करत पुन्हा एकदा तोच चेस मास्टर असल्याचं दाखवून दिले आहे. यासोबतच त्याचे मैदानावरील आकडे देखील हेच अधोरेखीत करतात. दरम्यान हे आकडे काय आहेत, हे जाणून घेऊयात. 

विराट चेस करताना इतक्यांदा भारत जिंकलाय? 

विराटला (Virat Kohli) चेस मास्टर का म्हणतात हे पुन्हा एकदा त्याने पाकिस्तानविरूद्ध (Pakistan) सामन्यात दाखवून दिले आहे. विराटने रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 82 धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विशेष बाब म्हणजे त्याने चेस करताना नाबाद राहण्याचा विक्रम कायम राखला आहे.

दरम्यान जेव्हा जेव्हा विराट (Virat Kohli) धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिला, तेव्हा तेव्हा टीम इंडियाने (Team India)  सर्व सामने जिंकले आहेत. साधारण टीम इंडियाने विराट धावांचा पाठलाग करताना 18 सामने जिंकले आहेत. यामुळे टीम इंडिया लक्ष्याचा पाठलाग करत असेल आणि विराट क्रीजवर उपस्थित असेल, तर विजयाची 100% हमी असते. यामुळेच त्याला चेस मास्टर म्हटले जाते. 

चेस करताना सर्वांधिक धावा ठोकल्या

विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या पहिल्या फलंदाजीदरम्यान 58 टी-20 सामन्यांमध्ये 39.36 च्या सरासरीने 1811 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 15 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याचबरोबर 51 सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 73.44 च्या सरासरीने 1983 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 20 वेळा 50+ धावांची इनिंग खेळली आहे. तसेच विराट कोहलीने 36 यशस्वी T20 आंतरराष्ट्रीय धावांचा पाठलाग करताना 1621 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 16 अर्धशतकेही झळकावली आहेत. विराटच्या या आकड्यावरूनही त्याला धावांचा पाठलाग करण जास्त चॅलेंजिंग वाटते. 

T20 विश्वचषकातील धक्कादायक सरासरी

T20 वर्ल्ड कपमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम थक्क करणारा आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये 9 यशस्वी पाठलाग करताना विराट भारतीय संघाचा भाग आहे. यादरम्यान, त्याने 518 च्या आश्चर्यकारक फलंदाजीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. या 9 यशस्वी धावांमध्ये त्याने 7 अर्धशतक ठोकली आहेत. 

विराट कोहलीची (Virat Kohli) हीच आकडेवारी तो का चेस मास्टर याचा दाखला देत आहे. म्हणूनच त्याला चेस मास्टर देखील म्हणतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *