Headlines

Ind vs Nz : संजू सॅमसनला पुन्हा वगळल्याने शशी थरूर संतापले; ऋषभ पंतवर साधला निशाणा

[ad_1]

India vs New Zealand, 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना  क्राईस्टचर्च येथे खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (kane williamson) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा संघ एका बदलासह मैदावर उतरला आहे तर भारतीय संघात (Team India) कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यावरुन आता मोठं राजकारण सुरु झालंय. या सामन्यातही यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसनला (sanju samson) वगळण्यात आले आहे. संजूला प्लेइंग-11 मध्येही स्थान मिळालेले नाही. भारतीय संघाच्या या कृत्तीमुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. आता काँग्रेस खासदार शशी थरूर (shashi tharoor) यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

सामन्याआधी ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते, असे वाटत असतानाच प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नाणेफेकपूर्वी, पंत हा मॅच विनर आहे आणि तो चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे असे स्पष्ट केले. कर्णधार शिखर धवनने कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने  संजू सॅमसनच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला पक्षपाती म्हणत टीका केली आहे. शशी थरूर यांनीही ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले शशी थरूर?

खासदार शशी थरूर यांनी बुधवारी ट्विट करून भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “ऋषभ पंत हा महान खेळाडू आहे, पण त्याच्या शेवटच्या 11 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. संजू सॅमसनची वनडे सामन्यांमध्ये सरासरी 66 आहे. त्याने गेल्या पाच सामन्यांमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत आणि अजूनही त्याला बेंचवर बसवले आहे. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देण्याच गरज आहे,” असे थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

IND vs NZ 3rd ODI: हिटमॅनचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!

दरम्यान, संजू सॅमसनने या दौऱ्यावर फक्त एकच सामना खेळला, ज्यामध्ये त्याने चांगल्या धावा केल्या. मात्र यानंतर त्याला बाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांकडून पंत आणि सॅमसनची तुलना केली जात आहे. भारतीय संघात संजू सॅमसन हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने 2015 पूर्वी पदार्पण करुनही आजपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली नाही. मात्र ऋषभ पंतने 2019 चा विश्वचषकात फक्त 5 एकदिवसीय सामने खेळूनही त्याला खेळवले जात आहे. त्याची आकडेवारी देखील चांगली नव्हती त्यामुळे संघ निवडीत पक्षपात होत असल्याचे म्हणत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *