Headlines

IND vs IRE : हार्दिक पांड्याचा गोलंदाजीचा निर्णय, पावसाची बॅटींग सुरु

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तर आयर्लंडला प्रथम बॅटींग करावी लागणार आहे. मात्र सामना सुरु होण्याआधीच पावसाची बॅटींग सुरु झाली आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यास उशीर होत आहेत. तसेच लवकरचं सामना सुरु होणार असल्याची  शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

डब्लिनमध्ये पाऊस थांबतोय आणि पुन्हा पुन्हा सुरू होतोय. या कारणास्तव अद्याप खेळ सुरू झालेला नाही. या सामन्याच्या टॉसलाही पावसामुळेच उशिर झाला होता. मात्र पाऊस थांबला आणि पुन्हा सुरु झाल्याने सामना सुरु होण्यास उशीर होत आहे.  

आयर्लंडविरुद्ध प्रथमच कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली आहे.हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकला प्रथम फलंदाजी करायची होती, पण अचानक पाऊस आल्याने त्याने गोलंदाजीचा निर्णय़ घेतलाय. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व भारतीय चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे.  

प्लेइंग  11
भारत: ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक

आयर्लंड: पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *